विवाहित जोडप्यांसाठी गर्भवती होणे हा सर्वात मोठा आनंद असतो. जे गर्भधारणेची योजना आखत आहेत त्यांच्यासाठी शारीरिक संबंधानंतर एक महिना प्रतीक्षा करणे खूप जास्त काळ आहे. गर्भधारणा चाचणीद्वारे गर्भधारणेची पुष्टी केली जाते. मासिक पाळी थांबल्यानंतरच ही चाचणी केली जाते.

तुम्ही गरोदर आहात, हे तुमच्या गर्भधारणेनंतर ४ ते ५ दिवसात देखील आढळू शकते. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, शारीरिक संबंध बनवल्यानंतर ३ ते ४ दिवसांत तुमच्या शरीरात गर्भधारणेची लक्षणे दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला गर्भधारणेच्या काही सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगत आहोत जे गर्भधारणेच्या ४ ते ४ दिवसांनंतरच दिसून येतात.

योनि स्राव

गर्भधारणेनंतर योनीतून स्त्राव होणे हा तुम्ही गर्भवती असल्याचा पुरावा आहे. गर्भधारणेनंतर, शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात, ज्यामुळे योनीची भिंत जाड होऊ लागते आणि योनीच्या पेशी खूप वेगाने वाढू लागतात.

( हे ही वाचा: प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…)

कॅम्प्स

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात क्रॅम्पिंग होऊ शकते. तथापि, कॅम्प्स येणे हे मासिक पाळी सुरू होण्याचे लक्षण देखील असू शकते.

स्पॉटिंग असू शकते

अंडे फलित झाल्यानंतर ६ ते १२ दिवसांनी हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. जेव्हा फलित अंडी तुमच्या गर्भाशयाच्या अस्तराला जोडते तेव्हा प्रक्रियेत काही रक्तवाहिन्या फुटतात, ज्यामुळे हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्त्राव पीरियड ब्लीडिंगपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. मासिक पाळीत रक्तस्राव खूप वेगाने होतो आणि कंबर आणि शरीरात दुखण्याची तक्रार असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मळमळ

वाढत्या संप्रेरक पातळीमुळे गर्भधारणेनंतर तुम्हाला मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. हे गर्भधारणेचे सामान्य लक्षण आहे.