बेंगलुरूमधील एका व्यक्तीने ‘कोरियन डोसा मेस्टिफ’ जातीचा कुत्रा चीनमधून मागवला आहे. या प्रजातीमधील हा भारतातील पहिलाच कुत्रा आहे. दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले चीनमधून आली असून, प्रत्येकाची किंमत एक कोटी रुपये असल्याची माहिती हा कुत्रा मागविणारे ‘इंडियन डॉग ब्रीडर्स असोशिएशन’चे अध्यक्ष सतीश एस. यांनी दिली. अशाप्रकारचा कुत्रा पहिल्यांदाच भारतात आल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. ‘कोरियन डोसा मेस्टिफ’ कुत्र्याची कातडी जाड असते. चपटे नाक असलेल्या या कुत्र्याची वास घेण्याची क्षमता जबरदस्त असते. अनोख्या वैशिष्ट्यांमुळेच हा कुत्रा इतका महाग असतो.