KTM ने भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित मिडलवेट स्पोर्ट-नेकेड बाइक 790 Duke लाँच केली आहे. ही बाइक म्हणजे केटीएमची भारतातील फ्लॅगशीप मॉडेल आहे. पहिल्या वर्षी भारतामध्ये केवळ या बाइकच्या १०० युनिट्सची विक्री होईल.

बाइकला शार्प आणि अॅग्रेसिव्ह लूक देण्यात आलं असून यामध्ये 799cc पॅरेलल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 103 bhp ऊर्जा आणि 86 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. कंपनीने या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स दिलेत. बाइकच्या पुढील भागात WP-सोर्स्ड USD फोर्क्स आहेत, तर मागे मोनोशॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंगसाठी पुढील व्हिलला 300mm ड्युअल डिस्कसह J.Juan क्लिपर्स दिलेत. तर, मागच्या व्हिलला 240mm सिंगल डिस्क ब्रेक आहे.

KTM 790 ड्युकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्ससह स्लिपर क्लच असिस्ट, 9-लेवल ट्रॅक्शन कंट्रोल, चार रायडिंग मोड्ससह लाइव्ह-बाय-वायर, कॉर्नरिंग ABS आणि सुपरमोटो मोड, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आणि व्हीली कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत. बाइकमध्ये १७ इंचाचे अॅलॉय व्हिल्स असून यामाहा MT-09, ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल RS, डुकाटी मॉन्स्टर 821, कावासाकी Z900 आणि सुझुकी GSX-R750 यांसारख्या बाइकशी KTM 790 ड्युकची स्पर्धा असेल.