कपडे धुण्यासाठी अनेक घरात साबण किंवा डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड वापरले जाते. पण बहुतेक लोकांना डिटर्जेंट आणि साबण यातील फरक माहित नसतो. डिटर्जेंट कपडे पाण्यात भिजवण्यासाठी वापरतात आणि साबण कपडे न भिजवता धुण्यासाठी वापरला जातो, असाच फरक माहित आहे. पण हा फरक नसून दोघांचा गुण आहे.

वास्तविक कपडे धुण्यासाठ वापरल्या जाणाऱ्या साबण आणि डिटर्जेंटमध्ये वॉशिंग कंपाउंड असतात. पण ते एकमेकांपासून बरेच वेगळे आहेत. यामुळे साबण आणि डिटर्जेंटमधील फरक समजून घेणे तुमच्या कपड्यांसाठी खूप महत्वाचे आहे.

साबण VS डिटर्जेंट

१) साबण फॅट आणि तेलांच्या सॅपोनिफिकेशन प्रक्रियेद्वारे तयार केले जातात . त्यामुळे साबणाला पाण्यात पूर्णपणे विरघळण्यास बराच वेळ लागतो.

२) पण डिटर्जंट हे एक क्लिनिंग एजंट आहे जे विशेषतः कपड्यांची स्वच्छता लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहे. कारण डिटर्जेंट साबणानंतर तयार करण्यात आलेला प्रकार असून त्यातून साबणातील सर्व कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कपड्यांचे फॅब्रिक लक्षात घेऊन करा निवड

१) सिल्क, कॉटन, वूलन यांसारखे फॅब्रिक असलेले कपडे अतिशय काळजीपूर्वक धुवावे लागतात. असे कपडे नेहमी डिटर्जंटने धुवावेत. कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता हे कपडे एकदम स्वच्छ निघतात.

२) त्याच वेळी, साबणामध्ये काही हार्ड केमिकल्स असतात, जी सर्व प्रकारच्या कपड्यांसाठी योग्य नसतात.

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी बेस्ट

१) कपड्यांवरील डाग काढण्यासाठी साबण फारसा प्रभावी ठरत नाही, अशा परिस्थितीत जर तुमच्या कपड्यांवर डाग पडले असतील तर तुम्ही डिटर्जंटचा वापर करा.

२) डिटर्जंटमध्ये डाग काढून टाकण्याची क्षमता असते. याच्या मदतीने तुम्ही कॉफी टी, ग्रेव्ही, ज्यूसचे डाग अगदी सहज काढू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपडे धुण्यासाठी करा वापरा

मुख्यत: साबण सर्वात आधी त्वचेच्या स्वच्छतेसाठी बनवण्यात आला होता. पण त्यानंतर कपडे धुण्यासाठीही साबणाची निर्मिती करण्यात आली. पण कपडे धुण्यासाठी डिटर्जेंट एवढा साबण प्रभावी काम करत नाही. यामुळे डिटर्जंटची निर्मिती विशेषतः कपडे स्वच्छ धुण्यासाठी करण्यात आली. म्हणूनच कपडे धुण्यासाठी नेहमी डिटर्जंटचा वापर करावा.