प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा असं वाटतं, सुंदर दिसण्यासाठी अनेकजण वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. तर काहीजण ब्युटी ट्रीटमेंटचा आधार घेतात. ही ट्रीटमेंट घेणं कितीही खर्चीक असंल तरीही लोकं पैशाचा विचार न करता ही ट्रीटमेंट घेतात. कारणं सुंदर दिसण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

दरम्यान,आपण चेहरा सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतो. मात्र, चेहऱ्याप्रमाणे आपण चार चौघात वावरत असताना लोकांची नजर आपल्या मानेवर देखील जाते. त्यावेळी चेहरा गोरा आणि मान मात्र काळपट असं चित्र निर्माण होतं आणि आपल्यावर लाजिरवाणं होण्याची वेळ येते. त्यामुळे चेहऱ्यासोबत आपली मान देखील सुंदर कशी दिसेल यासाठी काळजी घ्यायला हवी. यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

आणखी वाचा- Anti-aging Face Yoga: चेहऱ्यावरील सुरकुत्या आणतात तुमच्या सौंदर्यात बाधा? नियमितपणे करा ‘हा’ फेशियल योगा!

बेसन, लिंबू, दही आणि हळदीचे मिश्रण

एक मोठा चमचा बेसन पीठ घेऊन त्यात चिमूटभर हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दही घाला आणि या सर्वाचे मिश्रन करा. या बेसन, लिंबू, हळद आणि दही यांच्या मिश्रणातून तयार झालेली पेस्ट हळूवार मानेवर लावा. २० मिनिटांनंतर मानेवरील पेस्ट कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करा.

बेकींग सोडा –

बेकींग सोडा पाण्यामध्ये मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि १५ मिनिटांनी ती पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करायला सुरुवात केल्यास मानेवरील काळेपणा जाण्यास सुरुवात होईल.

दुध –

आणखी वाचा- Jaggery Tea: गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरु शकतं हानिकारक; कसं ते जाणून घ्या

मानेवरील काळेपणा दुर करण्यासाठी सर्वात सोप्पा उपाय म्हणजे गरम न केलेले दुध. हे दुध कापडाच्या साह्याने मानेवर लावा. मात्र हे दुध कमीत कमी एक महिनाभर लावा आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मानेवर परिणाम दिसून येईल.

कोरफड –

कोरफडही त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे. त्वचेच्या प्रत्येक समस्येवरती कोरफड हा एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे मानेवरचा काळेपणा दूर करण्यासाठी कोरफडीच्या फोडीवर दोन चमचे हळद टाका आणि त्या फोडीने मानेची मसाज करा. आठवड्यातून तीन वेळा मसाज केली तर तुमची मान उजळेल.

टोमॅटो –

टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मदत करतात. टोमॅटोमध्ये त्वचेसाठी फायदेशीर असणारे व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. त्यामुळे टोमॅटोचा वापर मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी केला जातो. टोमॅटोचे दोन भाग करा आणि त्याच्या फोडी मानेवरती चोळा त्यानंतर मान पाण्याने धुवून घ्या, तुम्हाला तुमच्या मानेवरील रंगात फरक जाणवेल. वरिल पध्दतीनं तुम्ही घरगुती उपाय केल्यास निश्चितच त्याचा फायदा होईलच. मात्र, मानेवरच्या त्वचेसंदर्भात काही गंभीर आजार असेल तर एकदा जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका.