Liver Health Foods: लिव्हर शरीरासाठी खूप महत्त्वाचं काम करतं, जसं की अन्न पचवणं, रक्त साफ करणं आणि विषारी घटक बाहेर टाकणं. पण जेव्हा लिव्हर थकतं किंवा व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. अशा वेळी फक्त औषध पुरेसं नाही, तर योग्य आहारही खूप उपयोगी ठरतो. काही अन्नपदार्थ असे असतात की, जे लिव्हरची समस्या आणखी वाढवू शकतात. जर तुम्हाला तुमचं लिव्हर लवकर बरं करायचं असेल, तर अशा गोष्टींपासून दूर राहणं समजदारीचं ठरेल.
खूप तेलकट (डीप फ्राय) अन्न
जेव्हा लिव्हर कमजोर असतं, तेव्हा तळलेले पदार्थ त्याला आणखी थकवतात. भजी, समोसे किंवा फ्रेंच फ्राइजसारख्या गोष्टी भरपूर तेलात तळलेल्या असतात, ज्यामुळे शरीरात चरबी वाढते आणि लिव्हरवर ताण येतो. अशा गोष्टींमुळे लिव्हरची सूज वाढू शकते आणि बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
अति गोड खाणं
जर लिव्हर आधीच त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर जास्त साखर खात असाल, तर ते लिव्हरसाठी आणखी नुकसानदायक ठरू शकतं. साखर थेट चरबीमध्ये बदलते आणि लिव्हरमध्ये साचते, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. गोड खाण्याची इच्छा थोडी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट
मटण, सॉसेजसारख्या गोष्टी पचवण्यासाठी लिव्हरला खूप मेहनत करावी लागते. कमजोर लिव्हर ही मेहनत करू शकत नाही, त्यामुळे त्याची अवस्था आणखी खराब होते. अशा वेळी हलकी आणि सहज पचणारी अन्नपदार्थच खायला हवेत.
जास्त मीठ
मीठ जितकं कमी, तितकं लिव्हरसाठी चांगलं. जास्त मीठ शरीरात पाणी धरून ठेवतं, ज्यामुळे सूज वाढते. जर लिव्हरमध्ये आधीच सूज असेल, तर जास्त मीठ असलेले पदार्थ, जसं की चिप्स, लोणचं किंवा प्रोसेस्ड फूड यापासून दूर राहणं गरजेचं आहे.
दारू
जर तुमचं लिव्हर नीट काम करीत नसेल, तर दारूपासून पूर्णपणे दूर राहणं चांगलं असतं. दारू लिव्हरला थेट नुकसान पोचवते आणि बरे होण्याची प्रक्रिया खूपच धीमी करते. फक्त दारूच नाही, तर जास्त कॅफिन आणि एनर्जी ड्रिंक्ससुद्धा लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकतात.
हे लक्षात ठेवा
कमजोर लिव्हर बरे होण्यासाठी वेळ लागतो; पण जर तुम्ही योग्य आहार घेतला आणि हानिकारक गोष्टींपासून दूर राहिलात, तर ते लवकर बरं होणं शक्य आहे. ज्या गोष्टी लिव्हरवर ताण आणतात, त्यापासून दूर राहणं हेच शहाणपण आहे.