महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी ६ डिसेंबरला भीम अनुयायी चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो.
करोनामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करायचे असल्याने भीम अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर जमू शकत नाही. मात्र तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरां यांच्या अनुयायांनी निराश न होता सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवून या महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देऊ शकतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त हे मेसेज पाठवत महामानवाला अभिवादन करा
कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या
समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
सचोटी आणि बुद्धिमत्ता
यांचा संगम झाल्याशिवाय
कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
बोलताना विचार करा
बोलून विचार करू नका.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे
‘हुकुमशाही’ आणि माणसांमाणसात
भेद मानणारी ‘संस्कृती’
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
मोठ्या गोष्टीचे बेत आखत
वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने
आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भरीव कामगिरी केली आहे. या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.