महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना गांधीजींच्या समोर अनेक आव्हाने सुद्धा उभी होती. तरीही गांधीजी यांनी कधीच हार न मानत त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि एकनिष्ठा दाखवत अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपले काम सुरुच ठेवले होते. याच पार्श्वभुमीवर येत्या २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती साजरी केली जाणार आहे.

जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्याबद्दल

महात्मा गांधी यांचे जन्म २ ऑक्टोंबर १८६९ मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला होता. गांधीजी यांना राजकीय नव्हे तर आयुष्यातील विविध पैलूवर त्यांचा उत्तम प्रभाव होता. समाज सुधारक, कुशल अर्थतज्ञ यांच्यासह उत्कृष्ट जनसंपर्क गांधीजी यांच्याकडे होते. महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात तीन महत्वपूर्ण सुत्रांच्या आधारावर आयुष्य जगण्याचे ठरविले होते. तसेच या सुत्रांमुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणून ही संबोधले गेले. पहिले सुत्र म्हणजे सामाजातील घाण साफ करणे. यासाठी गांधीजी यांनी झाडूचा आधार घेतला होता. त्यानंतर दुसरे सुत्र म्हणजे सामूहिक प्रार्थनेला बळ देणे. त्यामुळे एकजुटीने लोक जात-पात आणि धर्म न पाहता देवाची प्रार्थना करतील. तिसरे आणि महत्वपूर्ण सुत्र असे होती की, चरखा. तो गांधीजींचा आत्मनिर्भर आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. गांधीजींच्या याच तीन महत्वपूर्ण सुत्रांमुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वजण ओळखू लागले होते.

Parth Pawar, Rohit Pawar, Ajit Pawar,
भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार – रोहित पवार; अजित पवार यांना लगावला टोला
Ajit pawar
VIDEO : “माझा रेकॉर्ड…”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

महात्मा गांधी खूप सुशिक्षित होते

महात्मा गांधींना बॅरिस्टर व्हायचे होते. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि बॅरिस्टर होण्यासाठी तो लंडनला गेला. त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले आणि बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली. पण जेव्हा गांधीजी भारतात परतले तेव्हा देशातील परिस्थितीचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घ लढाई लढली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. गांधीजींच्या प्रयत्नांमुळे आज आपण एक मुक्त देश आहोत.

महात्मा गांधी जयंती यांचा इतिहास

महात्मा गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते, कारण गांधीजींचा जन्म २ऑक्टोबर रोजी झाला होता. गांधीजी त्यांच्या अहिंसक चळवळीसाठी जगभरात ओळखले जातात आणि जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गांधीजी म्हणायचे की अहिंसा हे एक तत्वज्ञान, एक तत्त्व आणि एक अनुभव आहे, ज्याच्या आधारे एक उत्तम समाज घडवणे शक्य आहे.

महात्मा गांधी जयंती कशी साजरी केली जाते?

गांधी जयंतीला राजघाट नवी दिल्ली येथील गांधी पुतळ्यासमोर लोक श्रद्धांजली अर्पण करतात. हा दिवस राष्ट्रीय सुट्टी असते. गांधी जयंतीचा उत्सव सर्व शाळा आणि कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोनामुळे लोक घरातच असल्याने प्रत्येकाने घरातच राहून महात्मा गांधी यांना उत्साहपणे श्रद्धांजली अर्पण करून ही जयंती साजरी करुयात.