Makar Sankranti Haldi Kunku Vaan Ideas : नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण ‘मकर संक्रांत’. ज्यांची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत असते त्यांच्यासाठी हा सण आणखीन विशेष ठरतो. या दिवशी नवीन नवरी काळ्या रंगाची साडी नेसून, हलव्याचे दागिनेसुद्धा परिधान करते. या सणानिमित्त सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. पण, सगळ्याच महिलांना उत्सुकता असते की, हळदी कुंकवाला वाण म्ह्णून कोणती वस्तू मिळणार? त्यामुळे दुसरीकडे हळदी कुंकवासाठी वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी या विचारात बऱ्याच महिला असतात. कारण- सुवासिनींना दिलेल्या वस्तू त्यांना उपयोगी वा आवडल्यासुद्धा पाहिजेत… तर तुम्हीसुद्धा याच विचारात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी भन्नाट आयडियांची यादी घेऊन आलो आहोत (Makar Sankranti Gift Idea)…

हळदी कुंकू करंडा

प्रत्येकाच्या घरात हळदी कुंकू ठेवण्यासाठी करंडा वापरला जातो. सोनेरी, चंदेरी, प्लास्टिकचे, मण्यांचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचेसुद्धा करंडे मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ही एक उपयुक्त आणि कमी खर्चीक अशी भेटवस्तू आहे.

Sunayana won gold medal in womens bodybuilding competition
खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
'लाडकी बहीण' सारख्या योजना कोणकोणत्या राज्यांनी सुरू केल्या आहेत? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Money Schemes For Women : ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना कोणकोणत्या राज्यांनी सुरू केल्या आहेत?
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
what is the difference between wife and mobile
मोबाईल आणि बायकोमध्ये काय फरक आहे? लोकांनी दिले भन्नाट उत्तरं, VIDEO एकदा पाहाच

नाणी ठेवण्यासाठी छोटी पर्स

बहुतेक महिलांच्या हॅण्डबॅगमध्ये किंवा पर्समध्ये नाणी ठेवण्यासाठी एक खास जागा असते. भाजी घेताना किंवा रिक्षाने प्रवास करताना सुटे पैसे लागतात. मग त्यासाठी मोठ्या पिशव्यांमध्ये पैसे शोधणे कठीण होऊ शकते. पण, त्यासाठी तुम्ही सुवासिनींना लहान पाउच किंवा पर्स देऊ शकता.

डबे

स्वयंपाकघरात स्त्रियांना सातत्याने डब्यांची (कंटेनरची) गरज भासते. घरात कितीही कंटेनर असले तरी पदार्थ किंवा एखादी वस्तू ठेवण्यासाठी आपण नेहमीच कंटेनर खरेदी करतो आणि ते कधीच रिकामी राहत नाहीत. आतमध्ये लहान कप्पे असलेला कंटेनर किंवा फक्त एक मोठा प्लास्टिक कंटेनरदेखील तुम्ही स्त्रियांना भेट म्हणून देऊ शकता.

हेही वाचा…Sleeping With Socks : रात्री मोजे घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे; पण ‘या’ चुकांमुळे होतील अनेक आरोग्य समस्या

रेसिपी बुक

नवनवीन पदार्थ बनवायला घरातील प्रत्येक सदस्याला आवडते. त्यामुळे रेसिपी बुक जवळपास असेल, तर आपण त्यातील नवनवीन रेसिपी वाचून, त्या बनवून पाहू शकतो. त्यामुळे वाण म्हणून रेसिपी बुक देणे महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल.

सुगंधित मेणबत्त्या

सुगंधित मेणबत्त्या कोणत्याही घरात आनंददायी वातावरण निर्माण करतात. विविध आकार आणि फ्लेवरच्या अनेक मेणबत्त्या बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे ही भेटसुद्धा खास ठरेल.

दिनदर्शिका

नवीन वर्ष सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. त्यामुळे तुम्ही निसर्गरम्य चित्रे, विविध राज्यांची छायाचित्रे असणारी दिनदर्शिकासुद्धा भेट म्हणून देऊ शकता.

सॅनिटर पॅड ठेवण्यासाठी पाऊच

ऑफिसमध्ये किंवा बाहेर गेल्यावर सामानात पॅड पेपरमध्ये किंवा पिशवीत गुंडाळून ठेवावे लागते. तर तुम्ही यासाठी मार्केटमधून किंवा स्वतः कापडाचे पाऊच शिवून घेऊ शकता आणि वाण म्हणून महिलांना देऊ शकता.

  • त्याचबरोबर तुम्ही लिपस्टिक, टिकल्यांचे पाकीट, आरसा, मॉइश्चरायझर, हातरुमाल, नोज पिन्स चंदेरी वा सोनेरी, अंगठ्या, बांगड्या किंवा कडे, नथणीसुद्धा देऊ शकता किंवा या वस्तू ठेवण्यासाठी बाजारात प्लास्टिकचे पाऊच उपलब्ध असतात तेसुद्धा तुम्ही महिलांना वाण म्हणून देऊ शकता…
  • त्याचप्रमाणे तुळशीचे रोप, साडी कव्हर, घर साफ करायचे हॅण्ड डस्टर, लहान-मोठी कापडी पिशवी आदी अनेक उपयोगी वस्तू तुम्ही सुवासिनींना यंदा हळदी कुंकवासाठी नक्कीच देऊ शकता.

हेही वाचा…Meal Plan For Winter : सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… थंडीत तुम्ही कसा आहार घेतला पाहिजे? वाचा, ‘ही’ आहारतज्ज्ञांनी दिलेली यादी

पर्यावरणस्नेही संक्रांत ‘वाण’ (Recycled items for Sankranti vaan)

टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘क्रिप्टिक ह्युज’च्या सह-संस्थापक अर्चना मोहोड म्हणाल्या, “संक्रांतीच्या काळात भेटवस्तू म्हणून पुनर्प्रक्रिया केलेल्या उत्पादनांनासुद्धा प्राधान्य दिले जात आहे. पुर्नप्रक्रिया केलेल्या बाटल्या, कंटेनरपासून बनवलेले प्लांटर्स (झाडे) हे लोकप्रिय पर्याय आहेत. त्यांची उंची तीन ते नऊ इंच आहे. पण, ५ ते ५.५ इंचाची झाडे वाण म्हणून देणे आणि सुवासिनींना घरी घेऊन जाणेसुद्धा सोपे जाईल.

बिया, माती व नारळाच्या काथ्यापासून बनवलेली छोटी भांडी असलेले स्प्राउट किट (Sprout Kit)देखील संक्रांतीच्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता. या स्प्राउट किटसाठी तुम्ही मिरची, वांगी, टोमॅटो इत्यादी बिया निवडू शकतात. हडपसर (Hadapsar) येथील गिफ्ट शॉपचे सेल्समन दर्शन चौगुले यांनी सांगितले की, बांगड्यांचे बॉक्स, कंगवा-क्लिप्स, हळदी-कुंकूचे बॉक्स वाण म्हणून देण्यासाठी नेहमीच लोकप्रिय आहेत. पण, अनेक ग्राहक आता रिसायकल (पुनर्प्रक्रिया) होणारे भेटवस्तूंचाही शोध घेताना दिसतात. फॅब्रिकपासून बनवलेले डोअर हँगर्स, पुठ्ठ्यापासून बनवलेले हळदी कुंकू बॉक्स विकत घेण्याकडेसुद्धा अनेकांचा कल असतो.

Story img Loader