scorecardresearch

Recipe: झटपट बनवा उन्हाळ्याची खास स्वादिष्ट ‘मटका कुल्फी’; जाणून घ्या रेसिपी

मलईदार, बर्फाळ कुल्फी कोणाला आवडत नाही. ही कुल्फी तुम्ही घरी देखील बनवू शकता.

matka kulfi
प्रातिनिधिक फोटो (क्रेडीट: Wikimedia Commons)

Summer Special: उन्हाळा आला आहे आणि तापमानात अचानक वाढ होत आहे. या अतिउष्णतेमुळे आपल्या आहारात बदल करण्याची गरज आहे. सध्या सगळ्यांच्याच खाण्याच्या सवयी बदलत आहेत. आइस्क्रीम, कुल्फी, पॉपसिकल्स अशा थंड आणि सुखदायक सर्व गोष्टी सगळेच आवडीने खात आहेत. मलईदार, बर्फाळ कुल्फी कोणाला आवडत नाही. ही कुल्फी तुम्ही घरी देखील बनवू शकता. घरी कुल्फी बनवणे हे अगदी सोपे काम आहे. फूड व्लॉगर पारुलने ही रेसिपी तिच्या ‘कुक विथ पारुल’ या यूट्यूब चॅनलवर शेअर केली आहे.

जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

मटका कुल्फी बनवण्यासाठी बदाम, काजू, पिस्ता, वेलची, साखर, ताजी मलई, केशर आणि दुधाची पावडर हवी.

(हे ही वाचा: Photos: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी करा ‘या’ चार पेयांचे सेवन!)

फोटो: Freepik

(हे ही वाचा: Potato Rings Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांत बनवा कुरकुरीत बटाट्याच्या रिंग्ज; जाणून घ्या रेसिपी)

कृती:

१. बदाम, काजू, पिस्ता, वेलची आणि साखर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.

२. एका भांड्यात ताजी मलई घेऊन फेस येईपर्यंत फेटून घ्या.

३. आता केशर आणि मिल्क पावडर टाकून चांगले फेटून घ्या.

४. ड्रायफ्रूटचे मिश्रण घालून पुन्हा फेटून घ्या,त्यात जास्तीची साखर घालू नका.

५. आता मटका (मोल्ड) घेऊन त्यात हे मिश्रण टाका.

६. शेंगदाण्या आणि केशर स्ट्रँडने सजवा आणि फॉइल पेपरने झाकून ठेवा.

७. किमान सहा तास रेफ्रिजरेट करा आणि आनंद घ्या.

व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी अगदी काही मिनिटात तयार करता येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make instant summer delicious matka kulfi learn the recipe ttg