तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्वाची आहे, नाहीतर डोळा गमावण्याची वेळ येऊ शकते. कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्याने अकॅन्थॅमोबा केरायटिस संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अमेरिकेतील कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या 85 टक्के लोकांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. इतकच नाहीतर फ्लोरिडामध्ये एका २१ वर्षीय तरुणाला आपली दृष्टी गमवावी लागली आहे. मायकल क्रुमहोल्ज असं या तरुणाचं नाव आहे.

मायकल नेहमी कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपायचा, एकदिवस असचं तो 40 मिनिटांची डुलकी घेऊ उठला, यावेळी समोरचं त्याला नीट दिसत नव्हतं. यावेळी त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा, त्याला अकॅन्थॅमोबा केरायटिस नावाच्या संसर्गाचे निदान झाल्याचे समजले. या आजारात सुरुवातीला दृष्टी अंधुक होते आणि नंतर डोळ्यात तीव्र वेदना जाणवू लागतात. मायकलच्या डोळ्यावर आत्तापर्यंत २ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. डॉक्टरांनी त्याला कॉर्नियल प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे.

तुम्ही रेल्वेने प्रवास करताय, मग ‘हा’ नियम तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे, अन्यथा…

रात्री झोपतानाही वापरू शकतो अशा अनेक कॉन्टॅक्ट लेन्सना एफडीएने मंजूरी दिली आहे. मात्र या लेन्स घालून झोपल्याने डोळ्यांसंबंधीत आजार मोठ्याप्रमाणात वाढतायत. या घटनेनंतर आता अनेक आरोग्य तज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

गुरुग्रामच्या आर्टेमिस रुग्णालयाचे नेत्र विज्ञान आणि अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. समीर कौशल यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटले की, कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्याने संक्रमणाची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे अशाप्रकारे डोळ्यांच्या आरोग्याशी खेळणं जीवावर बेतू शकते.

कॉन्टॅक्ट लेन्सचा मोठा परिणाम डोळ्याच्या बुबुळांवर होतो. बुबुळांवर लेन्समुळे पारदर्शक लेअर येते. या लेअरमध्ये रक्त वाहिन्या नसतात, फक्त हवेतील ऑक्सिजन शोषूण घेण्याचं काम या लेअर करतात. यामुळे डोळे बंद केल्यानंतर डोळ्यातील बुबुळांना योग्य ऑक्सिजन मिळत नाही आणि सकाळी उठल्यानंतर अंधुक दिसू लागते, मग काही वेळाने पुन्हा सगळं स्पष्ट दिसते. कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्यास अल्सरचा धोका वाढतो.

कॉन्टॅक्ट लेन्समुळे बुबळांमधील कॉर्नियाला सूक्ष्मजीवांशी लढण्यात आणि त्यांनी बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होतो. तसेच डोळ्यातील पाणी हा द्रव कमी होतो यामुळे अश्रू येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच डोळ्याची खाण, रोगजंतू हे डोळ्यातचं साठून राहतात. यामुळे संक्रमणाचा धोका पाच पटीने वाढतो, त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपू नका, शक्य झाल्यास लेन्स व्यवस्थित धुवा, यामुळे तुम्ही कॉर्नियल संक्रमणापासून वाचू शकता, अस मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यांना अकॅन्थॅमोबा केरायटिस संक्रमणाचा धोका वाढतो. यात डोळेदुखी, डोळे लाल होणे, अंधुक दिसणे, डोळ्यात पुरळ येणे, डोळ्यातून सतत पाणी येणं यांसारख्या समस्या जाणवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

१) लेन्स डोळ्यात व्यवस्थित सेट करा.
२) लेन्स स्वच्छ पाण्याने किंवा द्रवाने पूर्णपणे स्वच्छ करा.
३) लेन्स घालून पोहायला, अंघोळ करायला किंवा हॉट टबमध्ये जाऊ नका.
४) दूषित पाण्यापासून दूर राहा.