दिग्गज कार निर्माती कंपनी ‘मर्सिडिज-बेन्झ’ने भारतात नवीन G 350d SUV लाँच केली आहे. भारतीय बाजारात लक्झरी ऑफ-रोडमध्ये जी-क्लास हे आघाडीचे मॉडेल आहे. ही मर्सिडिज-बेंझच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पादन कालावधी लागलेले प्रवासी कार मॉडेल सीरिज आहेच, पण कंपनीच्या सर्व एसयूव्हींचे मूळ आहे.
मर्सिडिज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी मुंबई येथे नवी मर्सिडिज-बेंझ G 350 d लाँच केली. “1979 मध्ये निर्मिती झाल्यापासून, जी-क्लास जगभर अतुलनीय व वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. लक्झरी ऑफ-रोड वाहनांमध्ये हा बेंचमार्क आहे. आज, मर्सिडिज-बेंझने भारतातील चाहत्यांसाठी व ग्राहकांसाठी पहिलावहिला डिझेल जी-क्लास, म्हणजे मर्सिडिज-बेंझ G 350 d दाखल केली आहे. कस्टमायझेशनच्या असंख्य संधी असणारी G 350 d हे चाहत्यांसाठी लाइफस्टाइल वाहन आहे. या वाहनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधीत्व दिसू शकते. जी-क्लासमधील ऑफ-रोडिंग क्षमतांमुळे हे वाहन अधिक आकर्षक ठरते. 40 वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास असणाऱ्या जी-क्लासने या श्रेणीतील कमालीच्या स्पर्धेमध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. जी-क्लासच्या उत्साही चाहत्यांना त्यांची आवडती लक्झरी ऑफ रोडर नव्या स्वरूपातही आवडेल, अशी खात्री आहे,” असे मार्टिन श्वेंक म्हणाले.
आणखी वाचा : ‘मारुती’ला महागात पडली ‘टोयोटा’सोबत ‘मैत्री’!
1.5 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेल्या या लक्झरी SUV मध्ये 3.0 लिटरचं इनलाइन सहा सिलेंडरसह पावरफुल इंजिन देण्यात आलं आहे. कारचं इंजिन 286bhp ऊर्जा आणि 600Nm टॉर्क निर्माण करतं. चारही व्हिल्सला या इंजिनद्वारे ऊर्जा पुरवली जाते, यासाठी 4MATIC ऑल-व्हिल-ड्राइव्ह सिस्टिमचा उपयोग केला जातो. टॉर्कचं वितरण फ्रंट आणि रिअर व्हिल्सवर 40:60 अशा प्रमाणात होतं.
लूक्सच्या बाबतीत ही एसयूव्ही दमदार आहे. कारला मजबूत लॅडर-टाइप फ्रेम आणि हाय-स्ट्रेंथ स्टीलद्वारे डिझाइन करण्यात आलं आहे. कंपोजिट कंस्ट्रक्शनमुळे नवी G 350d एसयूव्ही ओबडधोबड रस्त्यांवर किंवा ऑफरोड देखील अगदी सहज चालवता येते. युनीबॉडी कंस्ट्रक्शन आणि डिझाइनमुळे ही कार ऑफरोडसाठी अधिक सक्षम व साजेशी झाली आहे. कारच्या बॉडी शेल्समध्ये अनेक ग्रेडच्या स्टीलचा वापर करण्यात आला आहे. कारचे विंग्स, बोनट आणि दरवाजे अॅल्युमिनियमपासून बनवण्यात आले आहेत.
इंजिन –