लग्झरी कार बनविणारी दिग्गज कंपनी मर्सिडीज-बेन्झने आपली नवीन V-class Elite कार भारतात लाँच केली आहे. ‘लग्झरी मल्टी-पर्पज वेहिकल’ (एमपीव्ही) अर्थात ‘शानदार, आरामदायी, बहुउपयोगी वाहनांचा’ प्रणेता म्हणून नावाजल्या जाणाऱ्या या ब्रॅण्डची ही नवीन कार म्हणजे पॅसेंजर कारचा सर्वोत्तम दर्जा आणि एमपीव्हीची अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता यांचा योग्य मेळ असल्याचं सांगितलं जातंय. ही अष्टपैलू गाडी असून यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आवड आणि गरजेनुसार अनेक कस्टमायझेशन पर्याय निवडता येतील.
मर्सिडीझ-बेंझ कारची सर्व वैशिष्ट्ये नवीन व्ही-क्लास एलिटमध्ये आहेत. अनेक सदस्य असलेली कुटुंबे, खेळांची आवड असलेल्या व्यक्ती, व्यावसायिक अशा अनेकांना त्यांच्या जीवनशैलीच्या दृष्टीने टॉप-एन्ड लक्झरी एमपीव्ही गाड्या गरजेच्या असतात. नवीन व्ही-क्लास एलिट अशाच ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मर्सिडीज-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी V-class Elite लाँच केली. यावेळी बोलताना श्वेन्क यांनी, “आमच्या जाणकार आणि चोखंदळ ग्राहकांसाठी आणखी एक अनोखी आणि अष्टपैलू कार सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात आम्ही व्ही-क्लास कार बाजारपेठेत आणली आणि लक्झरी एमपीव्ही विभागाची सुरुवात केली. ग्राहकांनी व्ही-क्लासला भरघोस प्रतिसाद दिला. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्यावरून आमच्या लक्षात आले आहे की भारतात व्ही-क्लास श्रेणी पूर्ण करण्यासाठी पुरेपूर संधी आहेत. त्यामुळे आम्ही आता व्ही-क्लास एलिट ही नवी लक्झरी एमपीव्ही सादर करत आहोत”, असं म्हटलंय. ही कार देशात लग्झरी प्रवासाचे उच्च मापदंड निर्माण करेल आणि या क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच, नवीन गाड्या सादर करण्याची परंपरा चौथ्या तिमाहीत देखील कायम राखली जाईल. पुढच्या वर्षी आम्ही दर महिन्याला एक गाडी दाखल करण्याचा प्रयत्न करू असंही श्वेन्क म्हणालेत.
आणखी वाचा- हॅरियर ते सफारी स्टॉर्म SUV , ‘टाटा’च्या कार्सवर १ लाखापर्यंत डिस्काउंट
व्ही-क्लास एलिटची प्रमुख वैशिष्ट्ये:
-मसाजिंग फंक्शन आणि क्लायमेट कंट्रोल सुविधा असलेल्या लक्झरी सीट्स
-रेफ्रिजरेटेड कंपार्टमेंट असलेले सेंटर कन्सोल
-बर्म्सटर सराउंड साउंड सिस्टीम
-पॅनोरॅमिक स्लायडिंग रूफ (ग्राहकांनी पर्याय निवडल्यास मिळेल)
-१७ इंची अलॉयज स्टॅंडर्ड, १८ इंची अलॉय (ग्राहकांनी पर्याय निवडल्यास मिळेल)
-अजिलिटी कंट्रोल सस्पेन्शन – सिलेक्टिव्ह डम्पिंग सिस्टीमसोबत
-मागील खिडकीच्या स्वतंत्र ओपनिंग सोबत इझी पॅक टेलगेट
-चामड्यापासून बनविलेल्या अपहोल्स्टरीमध्ये दोन पर्याय – सिल्क बेज / ब्लॅक
-चारही बाजूंनी लायटिंग
-ऍक्टिव्ह पार्क असिस्टसोबत ३६० अंशात फिरू शकेल असा कॅमेरा
-इलेकट्रीक स्लायडिंग दरवाजे
-ऍक्सेसरीजचे पॅकेज
इंजिन व ट्रान्समिशन
१२० केडब्ल्यू / १६३ अश्वशक्ती, ३८० एनएम टॉर्क, ११.१ एस मध्ये ०-१००, १९५० सीसीचे डिझेल इंजिन
९जी-ट्रॉनिक
सुरक्षा वैशिष्ट्ये
सहा एअरबॅग्स, अटेन्शन असिस्ट, ऍक्टिव्ह पार्क असिस्टसोबत ३६० अंशात फिरू शकेल असा कॅमेरा
प्री-सेफ
रंगांचे पर्याय
स्टील ब्ल्यू, सेलेन्टाईन ग्रे, ग्रॅफाइट ग्रे ऑब्सिडीयन ब्लॅक मेटॅलिक, कॅव्हन्सीट ब्ल्यू मेटॅलिक, रॉक क्रिस्टल व्हाईट मेटॅलिक, ब्रिलियंट सिल्वर मेटॅलिक
किंमत –
१.१० कोटी रुपये इतकी या कारची एक्स-शोरुम किंमत ठरवण्यात आली आहे.
