Moringa Health Benefits: भारतातील अनेक घरांमध्ये शेवग्याच्या शेंगांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? शेवग्याच्या शेंगेइतकीच शेवग्याची पानंदेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या वनस्पतीला चमत्कारी वृक्ष असेही म्हणतात. आयुर्वेदात या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे म्हटले आहे.

शेवग्याच्या पानाचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
तुम्ही शेवग्याची पाने पाण्यात उकळून गाळून ते पाणी पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह मोठ्या प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा सुधारते. याच्या सेवनाने केस गळणे कमी होते आणि नैसर्गिक चमक येते.

लठ्ठपणा कमी होतो
शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन सुधारते. याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या तर दूर होतातच, शिवाय मेटाबॉलिजम सुधारतो आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवग्याच्या पानांचा चहा कसा बनवायचा?

शेवग्याच्या पानांपासून चहा बनवण्यासाठी १५-२० ताजी किंवा सुकलेली शेवग्याची पाने एक ग्लास पाण्यात १० मिनिटे उकळवा. नंतर गाळून कोमट झाल्यावर प्या. चवीसाठी तुम्ही त्यात लिंबू किंवा मध घालू शकता.