Home Remedy for Kidney Cleansing: मूत्रपिंड (किडनी) म्हणजे आपल्या शरीराचं एक अत्यंत महत्त्वाचं अंग. शरीरातील “केमिकल फॅक्टरी” म्हणून ओळखली जाणारी ही अवयव जोडी २४ तास आपलं शरीर शुद्ध ठेवण्यासाठी कार्यरत असते. मूत्रपिंडाचं मुख्य काम म्हणजे शरीरात तयार होणारे विषारी घटक (टॉक्सिन्स) मूत्राद्वारे बाहेर टाकणं. पण, जर किडनीची कार्यक्षमता कमी झाली तर हे टॉक्सिन्स शरीरात साचू लागतात आणि त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अत्यावश्यक अवयवाच्या आरोग्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. तज्ज्ञांच्या मते, किडनीला निरोगी ठेवण्यासाठी महागड्या औषधांची किंवा उपचारांची गरज नाही. एक सोपं घरगुती पेय (Natural Kidney Cleanse Drink) रोज घेतल्यास किडनीचं आरोग्य सुधारू शकतं, असं मत आयुर्वेदिक आणि युनानीतज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी मांडलं आहे.

डॉ. जैदी यांच्यानुसार मूत्रपिंडाला स्वच्छ ठेवणारे हे खास ड्रिंक कसे तयार करावे?

१. सेबाचा सिरका (सफरचंदाचा व्हिनेगर) (Apple Cider Vinegar)

सेबाचं सिरकं हा या ज्युसचा प्रमुख घटक आहे. हे मूत्रपिंडात साचलेले अतिरिक्त खनिज (minerals) बाहेर काढण्यास मदत करतं आणि त्यामुळे मूत्रपिंडात खड्याची शक्यता कमी होते. सिरक्यातील सिट्रिक अ‍ॅसिड स्टोन विरघळवण्यात उपयुक्त मानलं जातं. याशिवाय, हे रक्तदाब आणि शुगर नियंत्रित ठेवतं आणि मूत्रपिंडातील सूज कमी करतं.

२. क्रॅनबेरी (Cranberry)

क्रॅनबेरी हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. याचा रस शरीरातील संक्रमणांपासून संरक्षण करतो. विशेषतः महिलांमध्ये होणाऱ्या युरिन इन्फेक्शन (UTI) पासूनच्या बचावात क्रॅनबेरी अत्यंत प्रभावी मानलं जातं.

३. लिंबू

लिंबामधील सॅट्रिक अ‍ॅसिड शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि मूत्रपिंडातील खड्यापासून संरक्षण देतो.
व्हिटॅमिन C ने भरपूर असलेले लिंबू मूत्रपिंडाला शुद्ध आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते.

४. मध

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे मूत्रपिंडाला संसर्गांपासून वाचवतं आणि तिचं कार्य सुरळीत ठेवतं. मधामुळे शरीरातील ऊर्जेचं संतुलनही टिकून राहतं.

ज्यूस तयार करण्याची पद्धत

एक मोठा ग्लास घ्या, त्यात २०० ml पाणी आणि २०० ml क्रॅनबेरीचा रस घाला. मग त्यात १ चमचा सेबाचं सिरकं, अर्ध्या लिंबाचा रस आणि १-२ चमचे मध मिसळा. हे मिश्रण नीट ढवळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हे नैसर्गिक ड्रिंक शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास आणि किडनीचं कार्य नियमित ठेवण्यास मदत करू शकते.

टीप:

ही माहिती आरोग्य-जागरूकतेसाठी (Health Awareness) आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.