Nag Panchami Leftover Rice Puffs: श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी काल २१ ऑगस्टला होऊन गेला. या दिवशी नागदेवतेचे पूजन केले जाते. त्यांना दूध व लाह्यांचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र काही वेळा नागपंचमीनंतर सुद्धा घरी एखादं लाह्यांचं, कुरमुऱ्यांचं पॅकेट शिल्लक राहतं. वेळीच वापर न केल्यास आठवड्याभरात किचनच्या एखाद्या कोपऱ्यात हे पाकीट पडून राहतं आणि मग नंतर आपल्यालाही विसर पडतो. पण आज आपण या लाह्यांचे असे काही फायदे पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही चुकूनही या लाह्या फेकून देणार नाही.

अलीकडे कामाच्या रगाड्यात अनेकदा जेवणाच्या वेळांचे वेळापत्रक पाळता येत नाही. दुपारी जेवणाला उशीर झाला की काही जण रात्री जेवण टाळतात. पण अचानक दोन- तीन वाजता भूक लागते मग पुन्हा तेव्हा काहीतरी खाणं होतं. यामुळे पोटाला पचनासाठी सुद्धा वेळ देता येत नाही. याचा परिणाम तर आपण सगळेच जाणतो. सकाळ झाली की भयंकर ऍसिडिटी, करपट ढेकर, मळमळ जाणवू लागते. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला टाकाऊ वाटणाऱ्या लाह्या अत्यंत मदतशीर ठरू शकतात.

अथर्वशीर्षात सुद्धा याविषयी माहिती देण्यात आली आहे.

यो दूर्वांकुरैंर्यजति
स वैश्रवणोपमो भवति।
यो लाजैर्यजति स यशोवान भवति।। स: मेधावान भवति।।

या श्लोकानुसार दुर्वा व लाह्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहेत. अथर्वशीर्ष व भारतातील प्रख्यात वैद्य प. य. खडिवाले वैद्य यांच्या माहितीनुसार, धान्याच्या लाह्या या ऍसिडिटी कमी करण्यास सर्वोत्तम आहेत. लक्षात घ्या लाह्या म्हणजे कुरमुरे नव्हे. सहसा पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या लाह्यांविषयी आपण बोलत आहोत. या लाह्या पोटात जाताच अतिरिक्त ऍसिड शोषून घेतात. शिवाय या लाह्या पचनास सोप्या असल्याने शौचामार्फत हे ऍसिड शरीरातून बाहेर टाकतात.

हे ही वाचा<< मासे खाऊन ऐश्वर्या रायसारखे तुमचेही डोळे सुंदर होणार का? मंत्री विजय गावितांच्या विधानानंतर डॉक्टरांचं मत वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाह्या अनसेपोटी खाल्ल्यास भूकही क्षमण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असल्यास मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी लाह्यांचा पर्याय विचारात घेऊ शकता.