लांब आणि सुंदर नखं अनेक मुलींना आवडतात. नखांमुळे हाताचे सौंदर्य आणखी वाढते. यासाठी नखांना योग्य पद्धतीने पॉलिश करुन आकार दिल्यास नखांना आणखी शोभा येते. अनेक महिला नखांची व्यवस्थित काळजी घेतात. पण काही महिलांची नखे फार नाजूक असतात तसेच त्यांच्या नखांची वाढही फार मंद असते, पण काही घरगुती उपाय करुन तुम्ही नखांची वाढ सुधारू शकता, यासाठी तुम्ही जोजोबा ऑइलचा वापर करु शकता. पण हे ऑइल नखांवर कसे वापरायचे जाणून घेऊ
नखांच्या वाढीसाठी जोजोबा ऑइल वापरण्याचे फायदे
१) नखे मजबूत आणि मुलायम होतात
जोजोबा ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, बी-कॉम्प्लेक्स आणि जस्त आणि तांबे सारखी खनिजे असतात, जी नखांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. हे मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते ज्यामुळे नखांवरील कोरडा थर काढता येतो. नखांना हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही जोजोबा ऑइल वापरू शकता. यामुळे नखे मजबूत होतात.
२) नखांच्या भोवतीचे क्युटिकल्स कमी होतात.
नखांच्या भोवतीची कडक, खडबडीत क्युटिकल्स नखांची वाढ रोखू शकतात, यामुळे अॅलर्जी होऊ शकते. पण जोजोबा ऑइलमधील गुणधर्म हे क्यूटिकल मऊ आणि कंडिशनिंग करतात. तुम्ही नियमितपणे जोजोबा ऑइलने नखांची मालिश केल्यास नखांभोवतीची त्वचा मॉइश्चराइझ होईल.
हेही वाचा – Beauty Tips: तुमची नखे वारंवार तुटतात का? तर ‘या’ सोप्या घरगुती उपायांनी दूर करा ही समस्या
३) फंगल्स इन्फेक्शन रोखता येते
नखांना अनेकदा फंगल्स इन्फेक्शन होते.ज्यामुळे नखांची वाढ खुंटते. पण जोजोबा ऑइलमध्ये फंगल्स इन्फेक्शनविरोधात लढण्याचे गुणधर्म असतात, यामुळे नखांवर जोजोबा ऑइलचे काही थेंब लावल्याने इन्फेक्शनची वाढ कमी होते. पण नखांच्या इन्फेक्शनवर जोजोबा ऑइल वापरण्याव्यतिरिक्त वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असू शकते.
४) नखांची चांगली वाढ होते
नखांच्या वाढीसाठी आपली नखे निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. जोजोबा ऑइल नखे वाढविण्याचे कार्य करते. नखांशी संबंधित किरकोळ समस्यांमध्ये तुम्ही जोजोबा ऑइल वापरू शकता. याने नखांना मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि नखांची वाढ होते.
नखांच्या वाढीसाठी जोजोबा ऑइल कसे वापरावे?
१) नखांना जोजोबा ऑइल लावण्यापूर्वी नखांवरील नेलपॉलिश काढा.
२) एक वाटीत थेंब जोजोबा ऑईल हलके गरम करुन घ्या.
३) यानंतर ड्रॉपर किंवा कॉटन बॉलच्या मदतीने प्रत्येक नखेला जोजोबा ऑइलचे काही थेंब लावा आणि नखेच्या त्वचेला मसाज करा.
४) तुमच्या बोटांनी काही मिनिटे सर्कलर मोशनमध्ये ऑइलने मालिश करा. यामुळे रक्त परिसंचरण सुधारते.
५) यानंतर रात्रभर नखं तशीच राहू द्या, सकाळी नखे स्वच्छ करा.
नखांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता. यामुळे नखांच्या समस्या दूर होतात आणि वाढ सुधारते.