रिअलमी कंपनीचा Narzo 10A हा स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर आज (दि.4) या फोनसाठी पुन्हा सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.   दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर फोनच्या फ्लॅश-सेलला सुरूवात झाली आहे.  या  स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑफर्स:-
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये  Narzo 10A फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. यामध्ये ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही 5 टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय, पार्टनर ऑफरअंतर्गत एक्स्चेंजमध्ये हा फोन खरेदी केल्यास 6 महिने गुगल वन ट्रायल फ्री मिळेल. तसेच, दर महिन्याला 1000 रुपये नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे.

Realme Narzo 10A ची किंमत :- 
Realme Narzo 10A हा स्मार्टफोन आधी एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होता. पण आता हा फोनही दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,999 रुपये तर, 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. Realme Narzo 10A स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

Realme Narzo 10A स्पेसिफिकेशन्स:-
रिअलमी Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G70 चिपसेट आहे. या फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मिनी-ड्रॉप फुलस्क्रीन असलेल्या या फोनमध्ये हाय ग्राफिक PUBG खेळता येईल. स्टोरेज वाढवण्यासाठी फोनला मेमरी कार्डचा सपोर्टही आहे. तर, 5000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीमुळे 43 तासांपेक्षा अधिक टॉकटाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. कॅमेऱ्यात अल्ट्रा मॅक्रो, पोर्टेट मोड आणि एचडीआर मोडशिवाय 4x झूम हे फीचर्स मिळतील. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये AI सपोर्टसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narzo 10a smartphone of realme goes on sale via flipkart check price offers and specifications sas
First published on: 04-09-2020 at 12:03 IST