Natural Ways to Reduce Cholesterol: कोलेस्ट्रॉल… हा शब्द ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो, कारण शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढलं की थेट हृदयाशी संबंधित आजार दार ठोठावू लागतात. स्ट्रोक, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर यांसारख्या जीवघेण्या समस्यांची सुरुवात याच कोलेस्ट्रॉलपासून होते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण-तणाव, जंक फूड, धूम्रपान, मद्यपान आणि बसून राहण्याची सवय ही कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणं ठरतात.
एकदा का कोलेस्ट्रॉल वाढलं की ते धमन्यांत साठू लागतं. रक्तप्रवाह अडखळतो, हृदयावर ताण येतो आणि कधी काय होईल याचा काही नेम नसतो. पण, खरी गोष्ट ही आहे की जर तुम्ही ठरवलं तर केवळ ३० दिवसांत वाढलेलं वाईट कोलेस्ट्रॉल नैसर्गिक पद्धतीने कमी करू शकता. कसं? तर हे आहेत ८ सोपे पण प्रभावी उपाय…
नसांतलं कोलेस्ट्रॉल बाहेर काढणारे ८ घरगुती उपाय
१. तळलेले पदार्थ टाळा
फ्राईड स्नॅक्स, बेकरी प्रॉडक्ट्स आणि प्रोसेस्ड फूडमध्ये असलेले ट्रान्स फॅट हे कोलेस्ट्रॉल वाढण्यामागचं मुख्य कारण आहे, त्यामुळे अशा पदार्थांना कायमचे ‘गुडबाय’ करा.
२. ओट्सचा नाश्ता
ओट्समध्ये भरपूर घुलनशील फायबर असतं. हे फायबर LDL कमी करून हृदयाला मजबूत बनवतं.
३. अळशीच्या बिया
एक ग्लास स्मूदीमध्ये रोज एक चमचा अळशीच्या बिया मिसळा. यातलं ओमेगा-३ आणि लिग्निन वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतं.
४. रेड मीटऐवजी माशांचा आहार
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यात किमान चार वेळा मासे खा. माशांतील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात.
५. ग्रीन टीचा कप
ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन आणि अँटिऑक्सिडंट्स धमन्यांतील सूज कमी करतात व हृदयविकारापासून संरक्षण देतात.
६. रोज दोन सफरचंद
दररोज ३० दिवस दोन सफरचंद खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर पडतं. सफरचंदातील पॉलीफेनॉल हृदयासाठी रामबाण ठरतात.
७. ऑलिव्ह ऑईलचा वापर
घरगुती स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास शरीरातल्या वाईट फॅट्सची पातळी कमी होते. हे तेल कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाला बळकटी देते.
८. दररोज ४५ मिनिटे ब्रिस्क वॉक
हेडफोन कानात, मनगटावर वॉच आणि पायांनी धरलेली ४५ मिनिटांची गती… एवढंच पुरेसं आहे हृदय निरोगी ठेवायला. फक्त ३ आठवड्यांतच परिणाम दिसू लागतो.
लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल हा शांतपणे शरीरात घर करणारा धोकादायक शत्रू आहे. सुरुवातीला काही लक्षणं जाणवत नाहीत, पण एकदा का हृदयावर त्याचा परिणाम दिसला की परिस्थिती हाताबाहेर जाते. म्हणून आजच जीवनशैलीत बदल करा आणि वरील ८ नैसर्गिक उपाय अमलात आणा.
जर तुम्हाला ३० दिवसांत निरोगी हृदय हवं असेल, तर ही संधी गमावू नका. नाहीतर… एक दिवस डॉक्टरांच्या हातात स्ट्रेचरवरच पोहोचाल!