उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होतेय. पहिल्या दिवशी घटस्थापना करून पुढे आठ दिवस देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो, देवीला दररोज पिवळ्या फुलांची माळ चढवली जाते, देवीपुढे सप्तशतीचा पाठ करून शारदीय नवरात्री व्रत केले जाते. यावर्षी नवरात्रात तृतिया आणि चतुर्थी तिथी एकत्र असल्यामुळे केवळ आठच दिवसांचा हा नवरात्रौत्सव असणार आहे. त्यात करोनाचं संकट अजून पूर्णपणे शमलेलं नाही. त्यामूळे गरबा आणि दांडियाने यंदाही नवरात्रौत्सव साजरा करता येत नसला तरी आपल्या जवळच्या मित्र मंडळी, नातेवाईकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे वेगवेगळे मेसेज, स्टेसस आणि कोट्स शेअर करून हा उत्सव आधीप्रमाणेच मोठ्या उत्साहात साजरा करू शकता. म्हणूनच खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे हटके मेसेज, स्टेटस आणि कोट्स….

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

नवरात्रौत्सवाचे शुभेच्छा देणारे मेसेज

१. आजपासून सुरू होणा-या नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
||अंबे माता की जय||
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

२. आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!

३.
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

४.
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !

५.
लक्ष्मीचा वरदहस्त सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे
जीवन होवो आनंदमय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

६.
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

नवरात्रौत्सवाचे स्टेटस

१.
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी

२.
व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

३.
जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटानाश होवो
जय माता दी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

४.
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

५.
देवी लक्ष्मीची कायम साथ राहो
देवी सरस्वतीचा डोकी हात राहो
श्री गणेशांचा घरात निवास राहो
आणि आई दुर्गेचा नेहमी आशीर्वाद राहो
नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा!

६.
आईच्या आराधनेचं पर्व आहे
आईच्या नवरूपांचं पर्व आहे
अडकलेली काम पूर्ण होण्याचं पर्व आहे
भक्तांच्या सुख-समृद्धीचं पर्व आहे
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा….

नवरात्रौत्सवाचे कोट्स

१. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो आणि तुमच्या परिवाला आनंद… नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा!

२.
घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे,
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,
दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,
कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
यंदा देवी फक्त देव्हाऱ्यात नाही तर मनातही बसवा,
मूर्तीसोबत घरच्या लक्ष्मीचाही आदर करा,
हेच आहे नवरात्रौत्सवाचे सार
शुभ नवरात्री !

३. कितीही लिहीलं तरी कमी आहे. खरंतर हेच आहे की, आई तू आहेस तर आम्ही आहोत. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

४. स्त्रीला आदराने, मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते…. शुभ नवरात्री!

५. दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.