प्रत्येक स्त्रीला तिचे केस खूप प्रिय असतात. स्त्रियांना छान, लांब, मजबूत आणि सुंदर केस हवे असतात. पण त्याचबरोबर केसांची योग्य निगा राखणे तेवढेच महत्वाच आहे. केसांची काळजी घेत असताना आपल्या कडून झालेल्या छोट्या चुका देखील केस लवकर खराब तसेच गळू लागतात. तसेच तुम्हाला तुमचे केस दीर्घकाळ चांगले ठेवायचे असतील तर ओल्या केसांमध्ये या ७ गोष्टी चुका अजिबात करू नका. कोणत्या आहेत या ७ गोष्टी जाणून घ्या.

ओले केसांवरून कंगवा/ ब्रश फिरवू नका.

केस सावरताना किंवा केसांमधील गुंता काढताना कळ बसू नये म्हणून काहीजण ओल्या केसांवरून कंगवा फिरवतात. तुम्ही ओल्या केसांवरून कंगवा फिरवत असाल तर ते चुकीच आहे. कारण जेव्हा तुमचे केस ओले असतात तेव्हा ते खूप कमजोर असतात, अशावेळी ब्रश लावल्यानं केस तुटण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केस पूर्णपणे सुकल्यानंतरच त्यावर कंगवा फिरवायला हवा.

ओल्या केसांवर हिटिंग टुल्स वापरू नका

अनेकवेळा कामाच्या घाईगडबडीत ओल्या केसांवर हिटिंग टुल्सचा वापर करतो. मात्र हे हिटींग टूल्सचा वापर केसांसाठी हानीकारक मानला जातात. कारण जेव्हा तुम्ही ओल्या केसांना हिटिंग टुल्सचा वापर करतात तेव्हा केस ओले असल्याने कमजोर असतात. त्यात हीट दिल्याने केस गळू लागतात. याशिवाय केस खराब देखील होतात. यामुळे तुम्ही कोणत्याही हिटिंग टूल्सचा वापर सुकलेल्या केसांवरच करायला हवा.

ओल्या केसांना बाधून ठेऊ नये

अनेकदा गृहिणी कामाच्या गडबडीत ओले केस बांधून ठेवतात. पण हे ओले केस बांधून ठेवणे देखील चुकीच आहे. कारण ओले केस कमकुवत असतात. त्यात तुम्ही त्यांना रबरने बांधून ठेवले तर केस तुटण्याची शक्यता असते. ओले केस सुकेपर्यंत मोकळे ठेवावेत केस सुकल्यानंतर मगच व्यवस्थित बांधावेत.

ओल्या केसांना ब्लो ड्राय करणं

ओल्या केसांना सुकवण्यासाठी ब्लो ड्राय केलं जातं. केस धुवून बाथरूमधून बाहेर येताच ब्लो ड्राय करू नका. सगळ्यात आधी केसांवरच पाणी झटकून घ्या. मग ड्रायरचया मदतीनं ब्लो ड्राय करा. ड्रायर जास्त गरम असू नये मिडीयम ठेवून हळूहळू केस सुकवावेत.

ओल्या केसांसह झोपू नये

अनेकदा काहीजण केस ओले ठेऊन तसेच झोपी जातात. ओले केस असताना कधी झोपू नये. यामुळे स्कॅल्पच्या फोलिसेल्सना नुकसान पोहोचू शकतं. जर तुम्ही रात्रीच्यावेळी केस धुतले असतील तर पूर्ण केस सुकल्यानंतरच झोपायला जा.

ओल्या केसांवर हेअर स्प्रे लावू नये

केसांवर वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर केला जातो. हेअर स्प्रे सुकलेल्या केसांवर लावल्यास केस चांगले राहतात आणि स्टाईलसुद्धा चांगली दिसते. ओल्या केसांवर हेअर स्प्रे लावल्यानं काही वेळासाठी केसांचा आकार बदलू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओल्या केसांना हवेत सुकवू नये

अनेकांना वाटतं की ओल्या केसांना हवेत सुकवणं हा नैसर्गिक पर्याय आहे. पण अनेक महिलांमधला हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हवेत केस सुकल्यानंतर जास्त कोरडे होण्याची शक्यता असते नंतर कंगव्यानं केस विंचरल्यानंतर तुटू लागतात. टॉवेलनं जोरात घासूनही केस पुसू नका.