Vivo V21 5G चे नवीन निऑन स्पार्क व्हेरिएंट भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

विवो वी २१ स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये ४,०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

lifestyle
फोनमध्ये इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.(photo: vivo twitter)

Vivo चा नवीन नियॉन स्पार्क व्हेरिएंट भारतात लॉंच करण्यात आला आहे. हा फोन एका फ्रेश आणि वायब्रेंट स्वरूपात तुम्हाला घेता येणार आहे. तसेच हा नवीन स्मार्टफोन निऑन स्पार्क, आर्कटिक व्हाइट, डस्ट ब्लू, सनसेट डॅझल या कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येणार आहे. Vivo V21 स्मार्टफोन एजी मॅट ग्लास फिनिशमध्ये असून या फोन मध्ये ६४mp चा दमदार कॅमेरा आणि ४४mp चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. या स्मार्टफोन मध्ये ३ जिबी एक्सटेंडेड रॅम सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. हा अल्ट्रा स्लिम स्मार्टफोन असून ज्याची जाडी ७.३९ मिमी इतकी आहे.

Vivo V21 5G स्मार्टफोनची किंमत

Vivo V21 5G स्मार्टफोन ८ जिबी (GB) रॅम आणि २५६ जिबी स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे. तसेच ८जिबी रॅम आणि १२८ जिबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या विवो वी २१ ५जी या स्मार्टफोन ची किंमत २९,९९० रुपये इतकी आहे. तर या फोनच्या ८जिबी रॅम आणि २५६ जिबी (GB) स्टोरेज व्हेरिएंट असलेला फोनची किंमत ३२,९९० रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर २,५०० कॅशबॅक दिला जात आहे. याचबरोबर यात एक वेळ स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देखील देण्यात येत आहे. तुम्ही हा स्मार्टफोन विवो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन वरून खरेदी करू शकता. फोनमध्ये एक युनिक OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन) देण्यात आला आहे.

Vivo V21 5G स्मार्टफोनचे वैशिष्ट्य

विवो वी २१ या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा FHD+ AMOLED AMOLED डिस्प्ले आहे. या फोनचे रिझोल्यूशन १०८०x२४०४ पिक्सेल देण्यात आले असून फोनचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये १५०० निट्सची पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. विवो वी २१ ५जी हा स्मार्टफोन MediaTek Helio Dimensity 800U प्रोसेसर सपोर्टसह येत असून हा फोन अँड्रॉइड ११ आधारित फनटच ओएस ११.१ वर काम करेल. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा ६४mp OIS नाईट कॅमेरा आहे. याशिवाय ८mp अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २mp मॅक्रो लेन्स दिले गेला आहे. त्यातच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ४४mp चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

विवो वी २१ स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये ४,०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध केली आहे. फोनमध्ये इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New neon spark variant of vivo v21 5g launches in india find out the price and features scsm

ताज्या बातम्या