ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही आहे. अनेकजण अंकशास्त्रानुसार गाड्या, फोनचे नंबर घेतात. काही जणांना आकडे लकी ठरतात. ज्या लोकांचा जन्म मुलांक ६ आहे, अशांना २०२२ हे वर्ष खूप शुभ ठरू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये काही चढ-उतार असू शकतात, परंतु आर्थिकदृष्ट्या हे नवीन वर्ष भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना या वर्षी छाप पाडण्याची पूर्ण संधी मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढू शकतो. जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मुलांक ६ येतो.

अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीही हे वर्ष चांगले राहील. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामात कमतरता राहणार नाही. या वर्षी आलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या माध्यमातून पैसा मिळवता येतील. तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. नवीन वर्ष व्यावसायिकांना चांगलं जाईल. व्यवसायाचा विस्तार होईल. वाहन आणि घर सुख मिळण्याची शक्यता आहे. ही जन्मतारीख असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्राचे स्थान शुभ आहे, विशेषत: त्यांच्यासाठी हे वर्ष सुख-सुविधांमध्ये वाढ करणारे सिद्ध होईल.

Shani Sadesati 2022: शनि लवकरच कुंभ राशीत करणार प्रवेश, ‘या’ नावाच्या लोकांना सुरु होणार साडेसाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेम जीवनात काही आव्हाने येऊ शकतात. जोडीदारासोबत काही ना काही कारणावरून भांडण होईल. पण वाद लगेच मिटतील. विवाहितांना वादापासून दूर राहावे लागेल. करिअरमध्ये जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षी नोकरी बदलणे टाळा. तुम्ही ज्या नोकरीत काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.