Chhello Show Child Artist Death: ऑस्कर २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘छेलो शो’ मधील बालकलाकार राहुल कोली याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. काही वर्षांपूर्वी त्याला ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. आज अखेरीस १० व्या वर्षी या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. राहुलच्या निधनानंतर ल्युकेमिया या आजाराविषयी अनेकांना विविध प्रश्न पडत आहेत. इतक्या लहान वयात हा आजार कसा झाला? ल्युकेमियाची लक्षणे काय? ल्युकेमियावर उपचार काय? अशा प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ल्युकेमिया म्हणजे नेमकं काय?

ल्युकेमिया हा एक कर्करोगाचा प्रकार आहे. यामुळे पांढऱ्या रक्तपेशींवर परिणाम होतो. ल्युकेमिया हा रक्त व अस्थिमज्जाचा कर्करोग आहे. जेव्हा अस्थिमज्जामध्ये ल्युकेमिया पेशींची असामान्य आणि जलद वाढ होते तेव्हा ल्युकेमिया विकसित होतो. ल्युकेमियाच्या वाढीमुळे विविध अवयव व उतींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. ल्युकेमिया बाबत गंभीर बाब म्हणजे जसा हा कर्करोग पसरतो तसेच शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण अधिक असते.

ल्युकेमियाचे लक्षण

ल्युकेमियाच्या बाबत चिंताजनक बाब अशी की, अमुक एकाच कारणाने हा आजार होत असल्याचे सिद्ध झालेले नाही त्यामुळे त्याची लक्षणेही स्पष्ट नसतात, मात्र आजवरच्या संशोधनात ल्युकेमियाच्या रुग्णांमध्ये काही सामान्य लक्षणे दिसून आली आहेत. यानुसार , ल्युकेमिया रुग्णांना सतत थकवा जाणवतो तसेच वजन कमी होणे, अशक्तपणा, वारंवार ताप किंवा सर्दीचा संसर्ग होणे स्नायू व हाडे दुखणे व रक्तस्त्राव असेही त्रास जाणवू शकतात. आपल्याया हे त्रास होत असतील तर ल्युकेमियाच झाला आहे असे तर्क स्वतः लावू नका. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

विश्लेषण: सौरव गांगुलीच्या पत्नीला चिकनगुनियाची लागण; डासांमुळे होणारा हा आजार कसा टाळाल?

ल्युकेमियाचा धोका कोणाला?

बहुतांश आजार हे वृद्धपकाळात होतात हे आपण जाणून आहोत पण ल्युकेमियाचा सर्वाधिक धोका हा २० वर्षांखालील व्यक्तींना असतो. सरासरी आकडेवारी पाहिल्यास दरवर्षी ६० हजाराहून अधिक ल्युकेमिया रुग्ण आढळून येतात. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ल्युकेमियाचा धोका अधिक असतो. तसेच मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांना एक्यूट माइलॉयड ल्यूकेमिया (AML) होण्याचा धोका अधिक असतो. तुम्ही दिवसातील किती वेळ हा रसायने व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणात घालवता यावरही ल्युकेमिया होण्याची शक्यता अवलंबून असते.

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscar chhello show child artist rahul koli death due to leukemia check which people get blood cancer svs
First published on: 11-10-2022 at 11:16 IST