‘तुमचे पालकच तुमचे आयुष्य ठरवतील.’ म्हणजे तुम्ही किती वर्ष जगणार आहात, हे तुमच्या पालकांच्या आयुष्यावर अवलंबून आहे. याचाच अर्थ तुमचे पालक जर जास्त वर्षे जगले तर तुमचेही आयुष्यमान वाढते. इंग्लंडमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी हा शोध लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी १ लाख ९० हजार जणांवर संशोधन केले. ज्यांचे पालक ७० वर्षे व त्यापेक्षा जास्त जगतात त्यांचे आयुष्यमान १७ टक्क्य़ांनी वाढते. त्याचबरोबर तुमच्या हृदयाचे आरोग्यही तुमच्या पालकांच्या जगण्यावर अवलंबून असते. तुमचे पालकांचे मृत्युसमयी वयोमान जास्त असेल तर तुम्ही तुमच्या साठीत व सत्तरीतही आनंदात आणि आरोग्यपूर्ण राहता. डॉक्टर तुमच्या हृदयाचे आरोग्य तपासताना तुमच्या आईवडिलांना हृदयरोग अथवा उच्च रक्तदाब आहे का याची चौकशी करतात. या चौकशीमागचे कारण हेच असते. जितके जास्त तुमच्या पालकांचे आयुष्य तितकीच हृदयरोगाची शक्यता कमी असते. इतकेच नव्हे तर तुमच्या पालकांच्या आयुर्मानावर कर्करोगाची शक्यताही अवलंबून असते. त्यामुळे तुमचे आरोग्य हे तुमच्या पालकांच्या हातात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents decide your destiny
First published on: 20-08-2016 at 01:47 IST