केंद्र सरकारकडुन मोफत रेशन सेवा – ‘पीएम गरीब कल्याण अन्न योजना’ मार्च २०२० पासून सुरू करण्यात आली. ही सेवा ३१ डिसेंबर २०२२ पासून बंद होणार आहे. केंद्र सरकारकडुन ही सेवा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय २८ सप्टेंबरला घेण्यात आला होता. या योजनेअंतर्गत ८० करोड नागरिकांना, प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य दिले जाते.

महिन्यातून एकदा मोफत उपलब्ध होणारे रेशन लॉकडाउनसारख्या कठीण परिस्थितीत खुप जणांसाठी आधार बनले. यासाठी वापरण्यात येणारे ४ टन तांदूळ, गहू महागाई कमी करण्यासाठी, आरबीआयवरील तणाव कमी करण्यासाठी केला जाईल असे मत व्यक्त करण्यात आले. ऑक्टोबरमध्ये धाण्याची चलनवाढ १२.०८ टक्के होती, जी नोव्हेंबरमध्ये ११.५५ टक्के झाली.

आणखी वाचा- Flashback 2022: यावर्षी ‘या’ सरकारी योजना झाल्या जाहीर; पाहा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कशी झाली या योजनेची सुरुवात:
मार्च २०२२ मध्ये भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. ज्यामुळे अनेकांवर आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत केंद्र सरकारकडुन नॅशनल फूड सीक्योरीटी ऍक्ट अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५-५ किलो धान्य देण्याची योजना राबवण्यात आली. एप्रिल २०२०मध्ये या योजनेची सुरुवात झाली. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये याचा कालावधी ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आला. त्यानंतर आणखी ३ महिन्यांसाठी याचा कालावधी वाढवण्यात आला. अखेर ३१ डिसेंबर २०२२ पासून ही सेवा बंद होणार आहे.