गरोदर महिलांमध्ये कमी आणि उच्च बीएमआय या दोन्हीमुळे गरोदरपणात गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात वजन कमी असलेल्या महिलांना गर्भपात, अकाली प्रसूती आणि प्रसूती दरम्यान बाळाचे वजन कमी असणे अशा समस्या निर्माण होतात. याशिवाय ज्या महिलांचे वजन बाळाच्या जन्माच्या आधीच जास्त असते त्यांना गर्भपात, गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब, अकाली प्रसूतीचा धोका असतो.

गरोदर महिलांनी स्वत:सोबतच गर्भातील बाळाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. अशा स्थितीत गर्भवती महिलांनी दर ४ तासांनी फळे व फळांचा रस याचे सेवन करत राहावे. फक्त तेच पदार्थ खाण्याची खात्री करा जे तुमच्यासाठी पौष्टिक आहेत. याशिवाय वजन वाढण्याची चिंता करण्यापेक्षा चांगले खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर महिलांनी कच्चे दूध पिऊ नये, मद्यपान किंवा धूम्रपान करू नये, कॅफिनचे प्रमाण कमी करावे, तसेच गर्भवती महिलांनी गरम मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

गर्भातील बाळाच्या जीवाला पोहचू शकतो धोका

गरोदरपणात महिलांच्या पोटाचा आकार वाढतो, त्याशिवाय गरोदर महिलांचे वजनही वाढते. त्यामुळे अशा परिस्थितीत चालताना असमतोल होऊन पडण्याचा तसेच तोल बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: जॉगिंग करताना किंवा वेगाने चालताना काही महिलांना पाठ, खालच्या ओटीपोटात वेदना होतात. तर चालताना तोल बिघदल्याने विशेषतः पोटावर पडल्याने जन्माला येणार्‍या बाळाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी चालताना योग्य काळजी घ्यावी.

गर्भपात होण्याचा धोका वाढतो

‘न्यू सायंटिस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, गरोदर महिलांनी कोणतीही खबरदारी किंवा नियम न पाळता दिवसातून बराच वेळ धावपळ केली तर त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. कारण या दरम्यान महिलांचे गर्भाशय ताणले जाते, त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरोदर महिलांनी दर काही तासांनी खात राहणे

महिलांनी प्रयत्न करावेत की त्यांनी दर काही तासांच्या अंतराने खात राहावे. तसेच फळे, नारळाचे पाणी किंवा ग्लुकोजमिश्रित पाणी इत्यादी सेवन करत राहावे. याव्यतिरिक्त मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी गरोदर महिलांनी लिंबू-पाणी किंवा आल्याचा चहा पिऊ शकतात. ताक, लिंबूपाणी, नारळपाणी, फळांचा रस किंवा शेक यासारखी पेयपदार्थ दिवसातून किमान ३-४ वेळा प्यावे.