scorecardresearch

Psoriasis Skin Disease: त्वचेवर सतत लाल चट्टे येतात? पित्त नव्हे तर असू शकतात ‘या’ गंभीर रोगाची लक्षणे

Symptoms of Psoriasis Skin Disease: उच्च रक्तदाब व तणावामुळे त्वचारोग सोरायसिसचा आजार बळावतो.

Psoriasis Skin Disease: त्वचेवर सतत लाल चट्टे येतात? पित्त नव्हे तर असू शकतात ‘या’ गंभीर रोगाची लक्षणे
Psoriasis Skin Disease Symptoms

Symptoms of Psoriasis Skin Disease: पावसाळ्यात सतत ओले कपडे घातल्याने अनेक प्रकारच्या ऍलर्जी होत असतात. अनेकदा साधे चट्टे वाटत असले तरी हे गंभीर त्वचा रोगांचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येणे हे फार सामान्य लक्षण आहे. अनेकदा डास चावल्याने किंवा एखादा चुकीचा पदार्थ खाल्ल्याने असं होत असेल असा समज असतो पण ही समस्या वारंवार होत असल्यास सोरायसिस या आजाराची चिन्हे असतात. शरीरात मुख्यतः व्हिटॅमिन डीची कमी असल्यास, थोड्यावेळ उन्हात आल्यावर त्वचेला त्रास होतो. उच्च रक्तदाब व तणावामुळेही सोरायसिसचा आजार बळावतो.

सोरायसिसमुळे अनेकांना त्वचेवर सूज, जळजळ व लाल चट्टे येणे अशी समस्या जाणवते. सोरायसिसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. कारण थोड्या बेजबाबदार वागणुकीमुळे मोठी समस्या उद्भवू शकते व त्रास वाढू शकतो. आज आपण सोरायसिस या आजाराचे लक्षण व काही सामान्य उपाय पाहणार आहोत मात्र तुम्हाला वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या..

सोरायसिसची लक्षणे (Symptoms of Psoriasis)

  • त्वचेची जळजळ होणे
  • त्वचेचा रंग बदलणे
  • त्वचेची सालं निघणे किंवा पापुद्रे दिसणे
  • त्वचेला खाज येणे
  • केस गळणे
  • शरीरावर लाल चट्टे येणे

सोरायसिसच्या रुग्णांनी ही काळजी घ्यावी (Psoriasis People Should Avoid Such Things)

उन्हात जाणे टाळावे

शिकागो येथील त्वचा तज्ज्ञ वेस्ना पेट्रोनिक-रोसिक यांच्या माहितीनुसार सोरायसिसची समस्या उन्हात गेल्यामुळे वाढू शकते त्यामुळे अशा व्यक्तींनी फार वेळ उन्हात राहणे टाळावे. सनबर्न म्हणजेच उन्हामुळे त्वचा भाजली जाणे याचा धोका सोरायसिस रुग्णांना अधिक होतो. यामुळे असहनीय जळजळ होते व त्वचा पित्त उमटल्याप्रमाणेच लाल होते.

How To Sleep Faster: आज रात्री लहान बाळासारखी झोप घ्या; झोपेचा ‘१०-३-२-१-०’ नियम काय सांगतो पाहा

तणाव कमी करा

सोरायसिसची समस्या तणावामुळेही बळावते. एकदा हा त्रास सुरु झाल्यावरही आपण कामाचा तणाव कमी केल्यास व मानसिक शांती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास सोरायसिसवर मात करू शकता असे तज्ज्ञ सांगतात.

त्वचा हायड्रेटेड ठेवा

थंडी व उन्हाळ्यात वातावरण काहीसे रुक्ष असते ज्यामुळे त्वचाही सुकी पडते. त्वचेचे पापुद्रे निघण्याचा त्रास अशावेळी होऊ शकतो काहीवेळा यामुळे त्वचा फाटून रक्तही येते. अशावेळी नेहमी मॉइश्चरायजर लावून स्किन हायड्रेटेड ठेवावी. सर्वात उत्तम उपाय म्हणजे तूप लावावे.

धूम्रपान व मद्यपान टाळा

सोरायसिस रुग्णांनी आपल्या आहारासोबत अन्य बाबतीतही थोडे नियंत्रण ठेवावे. शक्यतो धूम्रपान व मद्यपान पूर्ण टाळावे तसेच उत्तेजक पेयांचेही सेवन टाळावे किंवा कमी करावे.

(टीप – वरील लेख माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या