How To Control High Cholesterol: आपण रोज खाणाऱ्या पदार्थांमध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्या दिसायला साध्या असल्या तरी आरोग्यासाठी खूप मोठे फायदे देतात. तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अशाच काही साध्या बिया फायदेशीर ठरू शकतात. दिसायला छोट्याशा दिसणाऱ्या या बिया म्हणजे जणू हृदयासाठी रक्षण कवचच. तज्ज्ञ सांगतात की, या बियांमध्ये असे काही घटक आहेत, जे तुमचे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक छोटासा, पण शक्तिशाली उपाय, जो तुमच्या रक्तातील LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी करून HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढवतो, रक्तदाब नियंत्रित करतो व हृदयाची मजबुती वाढवतो.
हृदयासाठी गुप्त पोषक घटक
हा उपाय खूप सोपा आहे. या बियांमध्ये भरपूर चांगली चरबी, तंतुमय पदार्थ (फायबर) आणि प्रतिऑक्सिडंट्स, असे उपयुक्त घटक असतात, जे तुमच्या रक्तवाहिन्यांमधील वाईट कोलेस्ट्रॉल दूर करतात. त्यामध्ये मॅग्नेशियमदेखील आहे, ज्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि सर्वोत्तम बाब म्हणजे त्यामध्ये असलेले प्लांट स्टेरॉल्स शरीरातील कोलेस्ट्रॉल शोषले जाण्यास प्रतिबंध करतात.
रोजच्या आहारात कसा समावेश करावा?
- कच्च्या किंवा हलक्या भाजलेल्या स्वरूपात : खाल्ल्याने पोषक तत्त्वे कायम राहतात.
- नाश्त्यात मिसळा : ओट्स किंवा दह्यावर थोड्या प्रमाणात शिंपडा; त्यामुळे त्याचा क्रंच आणि चव अशा दोन्हींमध्ये वाढ होते.
- सॅलडमध्ये टाका : हिरव्या पालेभाज्या, ऑलिव्ह ऑईल आणि काही घटक मिसळून हे आरोग्यदायी बनवता येईल.
- ट्रेल मिक्स तयार करा: बदाम, अक्रोड, सुका मेवा आणि थोडेसे हे घटक मिसळून तुमच्यासाठी पोषक नाश्ता तयार.
- बेकिंगमध्ये वापरा : मफिन्स, एनर्जी बार्स किंवा होल ग्रेन क्रॅकर्समध्ये मिसळल्यास चव वाढते आणि हृदयास फायदा होतो.
- स्मूदीमध्ये मिसळा : सकाळच्या स्मूदीमध्ये थोड्या प्रमाणात टाकल्यास पचन मंद होते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.
रोजच्या जीवनात छोटासा बदल
सोप्या पद्धतीने ही नैसर्गिक उपाययोजना तुम्ही दिवसेंदिवस वापरू शकता. काही मिनिटांत तयार होणारा नाश्ता किंवा सॅलडमध्ये टाकलेला थोडासा क्रंच तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान ठरतो.
पण ही वस्तू नेमकी काय आहे?
सगळं वाचल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हा गुप्त उपाय म्हणजे भोपळ्याच्या बिया. होय, छोट्या, पण ताकदवान भोपळ्याच्या बिया, ज्यात संपूर्ण हृदयासाठी आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात आहेत. कच्च्या खाल्ल्या, हलक्या भाजलेल्या, सॅलड, स्मूदी किंवा बेकिंग पदार्थांमध्ये अशा विविध प्रकारे तुम्ही या बियांचा लाभ घेऊ शकता आणि नैसर्गिक पद्धतीने कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)