Red Soil Stories Shirish Gavas Brain Hemorrhage Symptoms Signs: आपल्या यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून कोकणातील खाद्य संस्कृती दाखवणारा यूट्यूबर शिरीष गवस याचे दु:खद निधन झालं. धडधाकट असणारा शिरीष अचानक गंभीर आजारानं ग्रस्त झाला आणि अखेर फक्त आणि फक्त 15 दिवसांतच त्यानं या जगाचा कायमचा निरोप घेतला. शिरीषच्या निधनानंतर या चॅनेलचं पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. अनेकांनी तर शिरीषच्या पत्नीला तू चॅनल पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू कर, असाही सल्ला दिलेला. अशातच आता शिरीषची पत्नी पूजानं आता अवघ्या महाराष्ट्राच्या मनात घर केलेलं ‘रेड सॉईल स्टोरीज’ पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्तानं पूजानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून पूजानं शिरीषसोबत नक्की काय घडलं हेदेखील सांगितलं आहे. दरम्यान अवघ्या १५ दिवसांत शिरीषसोबत नेमकं काय घडलं? शिरिषला कोणता आजार झाला होता आणि त्याची लक्षणं काय जाणून घेऊयात…
अवघ्या पंधरा दिवसात नेमकं काय घडलं?
शिरीषची बायको पुजा हिने सांगितले की, शिरीषला जुलै महिन्यात अचानक फिट आली आणि अवघ्या १५ दिवसात शिरीष आम्हाला कायमचं सोडून गेला. हे सगळं इतकं अचानक घडलं की पुढचे कित्येक दिवस ही गोष्ट पचवणं खूप जड गेलं. डॉक्टरांनी ब्रेन ट्यूमर असं निदान केलं. एक अत्यंत तल्लख बुद्धीच्या, प्रज्ञावान माणसाला नेमका मेंदूचा आजार व्हावा हेच मुळात न पटण्यासारखा होतं. शिरीषच्या मृत्यूने आम्ही परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातली कितीतरी कुटुंब हळहळली.
शिरीषला नेमकं काय झालं होतं?
पूजाने पुढे सांगितलं की, साधारण मार्च एप्रिलपासून शिरीषला मध्येमध्ये सर्दीचा त्रास सुरु झाला. कधीकधी शिरीषचं डोकेदुखी पण होतं. त्यासाठी पहिले फिजिशियन आणि नंतर इनटी म्हणजे नाक, कान, घासा तज्ज्ञाला शिरीषला दाखवण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला साइनसाइटिस (Sinusitis) चा त्रास आहे. त्याचे औषध उपचार सुरु असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीला त्याला किडनी स्टोनचा त्रास सुरु झाला. ज्यामध्ये ११ एमएमचा स्टोन असल्यान छोटी सर्जरी करावी लागली. सर्जरीनंतर शिरीष पहिलेसारखा ठणठणीत झाला. मग डॉक्टरांच्या परवानगीने श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागलो.
सुरुवातीलाच दिसलेली ‘ही’ लक्षणे
पूजा पुढे म्हणाली की,लेकीच्या वाढदिवशी मी शिरीष सर्वात आंनदी पाहिलं होतं. त्यानंतर सर्जरीच्या वेळी असलेला स्टेंन होतं ते काढण्यासाटी मुंबईला गेलो तिथे तो काढला आणि घरी परतलो. श्रीजाचा वाढदिवसाचा व्हिडीओ एडिट करुन तो अपलोड करेपर्यंत शिरीषला कुठलाही त्रास झाला नाही. त्याच्यामध्ये कुठलेही लक्षणं दिसली नाहीत. त्याच्या मृत्यूच्या १५ दिवस आधी त्याला उलट्या आणि पिताचा त्रास सुरु झाला, चक्कर यायला लागली. पोटात अन्नपाणी टिकत नव्हतं. अचानक बिघडलेली तब्येत आमच्यासाठीही चकरवणारी होती. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार सुरु केलेत. याच दरम्यान त्याला पहिल्यांदाच फिट आली. क्षणाचाही विलंब न करता गोव्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जनकडे घेऊन गेलो. त्यावेळी शिरीषला काही तासांच्या फरकाने फिट येत होत्या.
पुढे पूजा म्हणाली की, “आमच्या घरात मोठा दादा, मोठी वहिनी आणि शिरीषची बहीण प्राची सगळेच डॉक्टर असल्यामुळे कोणताही विलंब न करता आम्ही सीटी ब्रेन ही टेस्ट केली. त्यावेळी शिरीषच्या फिटचा त्रास वाढला आणि अनकॉन्शियस झाला. सीटीचा अहवाल आल्यावर त्यात कळलं की, त्याच्या मेंदूत गाठ आहे आणि पाणी भरलं आहे असं दिसून आलं. ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकताच आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हे सगळं इतक्या अचानक होत होतं की, तरीही मी खंबीरपणे उभी होती. मुंबईतील न्यूरो सर्जनशी संपर्क करुन शिरीषचे रिपोर्ट आणि त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. पण गोवा ते मुंबई हा ८ तासांचा बायरोड प्रवास आणि त्यात अशक्य असा मुसळधार पाऊसामुळे बायरोडने शक्यच नव्हतं. दुसरा पर्याय होता तो एअर एंबुलेंसचा पण त्यात बेशुद्ध माणसाला शिफ्ट करता येत नाही. हे समजल्यावर आम्ही हतबल झालो. त्यानंतर आम्ही गोवातील गोवा मेडीकल कॉलेजमध्ये आम्ही शिरीषला घेऊन गेलो. या हॉस्पिटलमध्ये बेस्ट न्यूरो सर्जन आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. अवघ्या दोन ते तीन तासात शिरीष कोमात गेला होता. शिरीषची क्रिटिकल परिस्थिती पाहून तिथल्या डॉक्टरांनी दोन ते तीन तासात त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. या ऑपरेशनदरम्यान शिरीषच्या डोक्यात साठलेले पाणी काढलं. त्यानंतर शिरीष प्रकृती थोडी स्टेबल झाली पण तो शुद्धीवर आला नव्हता. त्याच दिवशी ६ तासांच्या सर्जरीनंतर त्याच्या मेंदूमधील रक्ताच्या गाठीपण काढण्यात आल्या होत्या. दोन दिवसांनंतर शिरीष शुद्धीवर आला होता. त्यानंतर आमचा जीवात जीव आला. तो आम्हाला ओळखायला लागला. त्याला सगळं कळतं होतं. हे पाहून डॉक्टरांसह आम्हाला सकारात्मक वाटू लागलं. तीन चार दिवसांनी शिरीषची प्रकृती स्थिर झाल्यानंतर ट्यूमरचं ऑपरेशन करायचं ठरलं. अतिशय हायरिक्स ही सर्जरी होती, त्यामुळे यावेळी आम्ही मुंबईतील नामांकित न्यूरो सर्जनकडे सेकंड ओपिनियनसाठी संपर्क केला. त्यांनीदेखील आम्हाला या सर्जरीसाठी गो ऑन हा ग्रीन सिग्नल दिला.”
‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू
या दरम्यान ७-८ तासांच्या ऑपरेशमध्ये शिरीषच्या मेंदूतील ट्यूमर काही अंशी काढण्यात यश आले. परंतु हा ट्युमर अत्यंत संवेदनशील आणि नाजूक अशा मेंदूच्या अत्यंत आतल्या भागात होता. यावर न्यूरो सर्जनने सांगितलं की, या जागेवरचा ट्यूमर पूर्णपणे काढणे अशक्य आहे. हा ट्यूमर काढताना जराजरी धक्का लागला असता तर शिरीषच्या जीवाला धोका होता. शिरीषला गंभीर असा सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड एसओएल हायड्रोसेफलस हा आजार झाला होता.एसओएल म्हणजे मेंदूमध्ये जागा व्यापणारी गाठी ज्यामुळे मेंदूत पाणी होतं. या सर्जरीमध्ये डॉक्टर २० ते ३० टक्के ट्युमर काढण्यात यशस्वी झाले. कारण तो काढताना धक्कामुळे शिरीषच्या हालचालीवर, चालण्याबोलण्यावर त्याचा मेमरीवर परिणाम झाला असता. सर्जरी यशस्वी झाली पण ट्यूमर पूर्ण न काढता आल्यामुळे तो पुन्हा कधीही वाढू शकतो, ही भीती होतीच. तीन ते तीन दिवसांनी शिरीषची प्रकृती चांगली व्हायला लागली. औषध उपचारांसोबत व्यायामाला शिरीष प्रतिसाद देत होता.
सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड एसओएल हायड्रोसेफलस आजार म्हणजे काय?
हायड्रोसेफलस म्हणजे काय? हायड्रोसेफलस म्हणजे मेंदूच्या आतल्या पोकळ ठिकाणी सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) तयार होतो. या पोकळ ठिकाणांना वेंट्रिकल्स म्हणतात. CSF तयार झाल्यामुळे मेंदूवर दबाव येऊ शकतो
“हळूहळू त्याची प्रकृती सुधारत होती. पण अचानक चार पाच दिवसांनी शिरीषला ताप आला. त्यानंतर त्यांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्यात. त्यावेळी त्याच्या यूरिन आणि मेंदूच्या पाण्यात संसर्ग असल्याच समोर आलं. साधारण अशा मोठ्या सर्जरीमध्ये या प्रकारचा संसर्ग होतो,असं डॉक्टारांनी सांगितलं होतं. शिरीषच्या मेंदूतील गाठ अत्यंत नाजूक जागी असल्याने संसर्ग रोखणे अतिशय कठीण होतं. यानंतर त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. हळूहळू तो पुन्हा बेशुद्ध होऊ लागला आणि पाच दिवसांनी तिथे शिरीष आम्हाला कायमचा सोडून गेला…”