Xiaomi ची सब ब्रँड कंपनी Redmi ने भारतात गेल्या महिन्यात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Redmi K20 आणि K20 Pro हे लाँच केले होते. फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर या फोनच्या विक्रीसाठी आज(दि.5) एका खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.  दुपारी 12 वाजेपासून या सेलला सुरूवात झाली असून या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष आकर्षक ऑफर देखील आहेत.

ऑफर –

सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1,000 रुपयांची सवलत आहे. तसंच अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट आणि ‘फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’वर 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय, एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा बेनिफटची ऑफर देखील आहे.

किंमत –

Redmi K20 (6GB रॅम + 64GB स्टोरेज) – 21 हजार 999 रुपये

Redmi K20 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) – 23 हजार 999 रुपये

Redmi K20 Pro (6GB रॅम + 128GBस्टोरेज) – 27 हजार 999 रुपये

Redmi K20 Pro (8GB रॅम + 256GBस्टोरेज) – 30 हजार 999 रुपये

रेडमी K20 के स्पेसिफिकेशन्स –

6.39 इंच AMOLED डिस्प्ले,
स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 एसओसी प्रोसेसर
128जीबी इंटरनल स्टोरेज
6जीबी रॅम
अँड्रॉइड 9 पाय(MIUI 10)
फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता.

रेडमी K20 प्रो स्पेसिफिकेशन्स –
6.38 इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले,
स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसर,
8जीबी रॅम,
256जीबी इंटरनल स्टोरेज,
MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टिम
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला Sony IMX586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता.

चिनमध्ये लाँचिंगनंतर रेडमी K20 प्रो या स्मार्टफोनसाठी पहिला सेल आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी, चीनमधील ‘वीबो’ या संकेतस्थळावर जारी केलेल्या एका पोस्टरनुसार पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनच्या 2 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली होती. केवळ दोन तासांच्या आत एवढा मोठा प्रतिसाद मिळाला होता.