Food To Reduce Bad Cholesterol: आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत कोलेस्ट्रॉल ही समस्या अगदी सामान्य झाली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्यास ती शरीरासाठी किती घातक ठरू शकते हे अनेकांना माहीतच नसतं. कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या शरीरातील एक प्रकारचं चरबीसदृश घटक, जो हार्मोन्स, निरोगी पेशी आणि व्हिटॅमिन D तयार करण्यात मदत करतो. परंतु, अयोग्य आहार आणि सवयींमुळे हेच कोलेस्ट्रॉल वाढतं आणि “LDL” म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात जमू लागतं आणि तिथूनच सुरू होतो हृदयरोगांचा खेळ.
डायबिटीस, उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवणारा हा “LDL कोलेस्ट्रॉल” केवळ औषधांनीच नाही, तर नैसर्गिकरीत्यादेखील कमी करता येऊ शकतो. आश्चर्य म्हणजे फक्त तीन महिन्यांत हा वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो. जर आपण दररोज ‘या’ ५ गोष्टींचा समावेश आपल्या आहारात केला, तर! चला तर पाहूया, कोणत्या आहेत या पाच ‘हृदयरक्षक’ अन्नपदार्थांची यादी
ओटमिल
ओटमिलमध्ये विपुल प्रमाणात घुलनशील फायबर असतं, जे रक्तातील LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं. दररोज फक्त ५–१० ग्रॅम फायबर घेतल्यास काही आठवड्यांतच कोलेस्ट्रॉलची पातळी नैसर्गिकरीत्या घसरू लागते. सकाळच्या नाश्त्यात ओटमिलचा एक वाडगा म्हणजे दिवसाची सुरुवातच हृदयस्नेही.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि माशांचे फायदे
सॅल्मन, मॅकेरल, टूना, ट्राउट अशा माशांमध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स हृदयासाठी अमृतासमान आहेत. हे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करून हृदयावरचा ताण हलका करतात. आठवड्यातून दोनदा फॅटी फिश खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका लक्षणीय घटतो.
मेवा-छोटा स्नॅक
दररोज एक मूठ बदाम किंवा अक्रोड खाणं म्हणजे कोलेस्ट्रॉलविरुद्धचं कवच. यात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन E आणि फायबर असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात. संशोधनानुसार, रोज नट्स खाल्ल्याने LDL जवळपास ५% पर्यंत कमी होतो.
सोया पदार्थ
टोफू, सोया मिल्क, सोया नगेट्स आणि सोयाबीन हे सर्व प्रोटीन आणि फाइटोएस्ट्रोजेनने समृद्ध आहेत. हे घटक शरीराला कोलेस्ट्रॉल प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवतात आणि LDL कमी करतात. आठवड्यात काहीवेळा सोया पदार्थांचा समावेश केल्यास हृदयाचे स्नायू अधिक बळकट राहतात.
प्लांट स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स
हे घटक फळं, भाज्या, बिया आणि संपूर्ण धान्यांमध्ये आढळतात. हे आंतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करून त्याचं प्रमाण घटवतात. रोज फक्त २ ग्रॅम स्टेरॉल्स घेतल्याने LDL मध्ये १०% घट संभवते. आपल्या आहारात फळं, भाज्या आणि धान्यांचा समावेश ही हृदयासाठी सर्वोत्तम गुंतवणूक आहे.
निष्कर्ष
तर मित्रांनो, फक्त तीन महिन्यांत आपलं हृदय पुन्हा निरोगी आणि तरतरीत बनवणं शक्य आहे. औषधांवर अवलंबून न राहता, या ५ नैसर्गिक अन्नपदार्थांनी “वाईट कोलेस्ट्रॉल” कमी करून तुमच्या हृदयाला द्या नवीन आयुष्य.
आजपासूनच या ५ गोष्टी आहारात जोडा आणि पाहा बदल, तुमच्या रक्तात आणि उत्साहात दोन्ही ठिकाणी जाणवेल!
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)