Wife Should Avoid Five Things In Front Of Husband : पती-पत्नीचे नाते जितके घट्ट असते, तितकेच ते लग्नाच्या सुरुवातीच्या काळात नाजूक असतात. लग्नाच्या फेर्‍या घेताना एक स्त्री आणि पुरुषही सात वचने घेत असतात. प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात, पण खऱ्या आयुष्यात दोन व्यक्तींनी एकत्र राहणं, एकमेकांना समजून घेणं इतकं सोपं नसतं. तुमच्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या जोडीदाराच्या मनात नाराजी आणू शकतात आणि नात्यात खळबळ भरू शकतात. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात पती-पत्नीला तडजोड करावी लागते. जेव्हा ते एकमेकांना समजून घेण्याच्या टप्प्यात असतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. कधी कधी अर्धा प्रॉब्लेम तुमच्या पार्टनरला न आवडणारे काहीतरी बोलल्यामुळे येतो. विशेषत: स्त्रियांनी जर काही गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या नात्यात येऊ शकतो.

नातं घट्ट करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी पत्नींनी पतीसमोर विचारपूर्वक बोललं पाहिजे. पत्नींनी पतीशी बोलताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जाणून घ्या त्या पाच गोष्टींबद्दल जे पत्नीने पतीसमोर करू नये.

माहेरच्यांची जास्त स्तुती करू नका
लग्नानंतर स्त्रिया अनेकदा पती किंवा सासरच्या लोकांसमोर माहेरच्या लोकांची प्रशंसा करतात. माहेरच्यांची जास्त स्तुती करणं टाळा. तुमच्या माहेरच्यांची जास्त प्रशंसा केल्याने तुमच्या पतीला असं वाटू शकतं की, तुम्ही तुमच्या माहेरच्यांची तुलना त्याच्या कुटुंबाशी करत आहात. पतीला असंही वाटू शकतं की, तुम्ही त्यांच्यासोबत आनंदी नाहीत आणि म्हणूनच तुम्ही अनेकदा तुमच्या माहेरच्यांचीच प्रशंसा करता. नवऱ्याला हे कधी तरी खटकू शकतं.

आणखी वाचा : Shani Sade Sati 2021 : शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्यामुळे त्रस्त असाल तर लगेच हे उपाय करून पाहा!

सासरकडच्यांबाबत वाईट बोलणं
आपल्या पत्नीने माझ्या कुटुंबाला आपलं मानलं पाहिजे, असे जवळजवळ प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पतीसमोरच तुमच्या सासू, वहिनी किंवा नणंद यांच्याबद्दल वाईट बोलाल तर तुमच्या पतीला ते आवडणार नाही. तो तुम्हाला काही सांगणार नाही, पण नवर्‍यासमोर वारंवार सासरच्यांना टोमणे मारणं ही चांगली गोष्ट नाही. यामुळे नात्याबाबत पतीच्या मनात कडवटपणा येऊ शकतो.

आणखी वाचा : Marriage Tips: लग्नानंतर मुली ‘या’ अडचणींमुळे चिंतेत असतात; जाणून घ्या सविस्तर…

पतीची तुलना करू नका
आपली तुलना दुसऱ्या पुरूषासोबत केलेली कोणत्याच नवऱ्याला आवडणार नाही. विशेषतः जर तुम्ही तुमच्या पतीची तुलना इतर पुरुषांशी केली तर त्याला वाईट वाटेल. यामुळे त्याला तुमच्यावर राग येऊ शकतो किंवा वादही होऊ शकतो.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतीकडे लक्ष द्या
प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे पूर्ण महत्त्व हवं असतं. कोणत्याही कार्यक्रमात किंवा संमेलनात पतीला विसरू नका. त्यांना महत्त्व आणि वेळ द्या. मित्र किंवा नातेवाईकांमध्ये इतके व्यस्त राहू नका की तुम्हाला तुमच्या पतीसोबत वेळ घालवणं विसरून जाल. पतीला तुमचं लक्ष हवं असतं. विशेषतः तुमच्या आणि त्यांच्या मित्रांसमोर. तसं न केल्यास त्यांना वाईट वाटू शकतं आणि नातेसंबंधात अंतर येऊ शकतं.