Marriage tips : आपल्या देशात लग्न हे दोन व्यक्तींमधील जन्म-जन्माचं नातं मानलं जातं. लग्न हे असं नातं असतं ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. त्याचबरोबर केवळ मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटुंबेही त्यांच्या लग्नामुळे एकत्र येतात. अशा परिस्थितीत जर लग्न ठरलं असेल, म्हणजेच नातेसंबंध तयार होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरबद्दल माहिती नसेल, तर लग्न करण्यापूर्वी नक्कीच त्याच्याबद्दल जाणून घ्या. पती-पत्नीला एकमेकांना हळूहळू जाणून घेण्यास आणि जीवनाशी जुळवून घेण्यास बराच वेळ मिळतो, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या लग्नापूर्वी जाणून घेतल्याच पाहिजेत. जर तुम्हाला लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी आधीच माहित असतील तर तुम्ही दोघे एकमेकांसाठी योग्य आहात की नाही? तुमचं पुढचं आयुष्य कसं असू शकतं आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कसं जगायचं आहे? हे समजून घेणं सोपं होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या पाच गोष्टी ज्या प्रत्येक मुलीला लग्नाआधी तिच्या जोडीदाराबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

मनाप्रमाणे लग्न होतंय का?

मुलगा असो की मुलगी, दोघांनीही लग्नाआधी आपल्या भावी जोडीदाराला हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे की लग्न त्यांच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार होत आहे का? कोणत्याही दबावाखाली त्याने लग्नाला होकार तर दिलेला नाही ना? घरच्यांच्या दबावाखाली मुलगा किंवा मुलीला लग्न करावं लागतं, असं अनेकदा अरेंज्ड मॅरेजमध्ये घडतं. त्यांना तुम्ही आवडत नसाल किंवा कदाचित त्यांना आधीच कोणीतरी आवडत असेल, असं ही असू शकतं. अशा स्थितीत या प्रश्नाने तुम्हा दोघांचं भवितव्य सुरक्षित राहू शकतं.

पसंत आणि नापसंत

लग्नाआधी आयुष्याच्या जोडीदाराच्या आवडी-निवडीबद्दल थोडं माहिती असायला हवी. शाकाहारी आहेत की मांसाहारी? तुम्ही मद्यपान किंवा धूम्रपान करता का? तुम्हाला ते आवडतं की नाही? याशिवाय त्यांच्या आवडींबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्या. यावरून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाचीही कल्पना येते आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही त्यांना अनोळखी समजणार नाही.

करिअर प्लॅन

लग्न हे भविष्याशी निगडीत नातं आहे. त्यामुळे एकमेकांचे करिअर, नोकरी आदींबद्दलची चर्चा करून क्लिअर करा. ते काय करतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यांचा पगार किती? भविष्यातील करिअरबाबत त्यांच्या काय योजना आहेत? याशिवाय तुम्ही नोकरी करत असाल तर हेही जाणून घ्या की त्यांना लग्नानंतर तुमच्या नोकरीबाबत काही अडचण तर नाही ना? लग्नानंतर दुसरीकडे स्थायिक होण्याचा त्यांचा मानस नाही का?

आणखी वाचा : घरातली तुळस देखील देते शुभ-अशुभ घटनांचे संकेत, ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष करू नका

तुमच्याबद्दल काय विचार करतात ?

लग्नासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांबद्दल सकारात्मक विचार करणं. त्याला तुमच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. त्यामुळे तो आपल्या मर्जीने तुमच्याशी लग्न करतोय, ही गोष्ट कळते. त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील जाणून घ्या. त्याला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे? हे सुद्धा तुम्हाला कळेल.

आणखी वाचा : Chanakya Niti : अशा लोकांकडे लक्ष्मी कधीच येत नाही, चाणक्य नीतिमध्ये सांगितल्या आहेत ‘या’ गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंब नियोजन

तुमच्या भावी आयुष्याच्या जोडीदाराला कुटुंब नियोजनाबद्दल विचारा. लग्नानंतर कुटुंब वाढवण्याचा विचार कधी करणार आहेत? तुम्हाला किती मुलांची अपेक्षा आहे? मुलांबद्दल त्यांचं काय मत आहे? हे प्रश्न तुमच्यासाठी उपयोगाचे ठरू शकतात.