जीवघेण्या करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी रिलायंस जिओने आपल्या युजर्सना या व्हायरसबाबतची सर्व आवश्यक माहिती देणारे एक नवीन फीचर आणले आहे. कंपनीने आपल्या MyJio App मध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश केलाय. या नव्या फीचर्समुळे युजर स्वतःच व्हायरसच्या लक्षणांची तपासणी करू शकतील. विशेष म्हणजे जिओने नॉन जिओ ग्राहकांसाठीही आपले MyJio App हे अ‍ॅप ‘ओपन’ ठेवले आहे. त्यामुळे आता कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा युजर हे अ‍ॅप डाउनलोड करुन करोना व्हायरसच्या लक्षणांची तपासणी करु शकेल. सोप्या भाषेत समजून घेऊया काय आहे हे फीचर –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

MyJio App मध्ये एका बॅनरवर #CoronaHaaregaIndiaJeetega असे लिहिलेले दिसत आहे. या अ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये symptoms checker हा नवा पर्याय आलाय. याशिवाय, देशभरातील करोना व्हायरस टेस्ट सेंटर्सची लिस्ट, टेस्ट सेंटर्सचा पूर्ण पत्ता, करोनाग्रस्तांची आकडेवारी, हेल्पलाइन नंबर आणि FAQ यांसारखे अनेक पर्यायही आहेत. symptoms checker या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन MyJio App अपडेट करावे लागेल. symptoms checker द्वारे तुम्हाला आरोग्य आणि प्रवासाबाबत प्रश्न विचारले जातील, आणि उत्तरांच्या आधारे करोना व्हायरस होण्याची शक्यता आहे किंवा नाही हे सांगितले जाईल. जाणून घेऊया कसा करायचा वापर :-

MyJio App अ‍ॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला #CoronaHaregaIndiaJeetega हे लिहिलेल्या बॅनरवर टॅप करावे लागेल. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला Check your symptoms now असा पर्याय दिसेल. त्यानंत पुढील स्क्रीनवर symptoms checker ऑप्शनवर टॅप करा. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील.

1) सर्वात पहिला प्रश्न असेल, ही टेस्ट तुम्ही कोणासाठी करत आहात.
2) यानंतर तुमचं वय किती असा प्रश्न विचारला जाईल
3) आरोग्याबाबत प्रश्न विचारले जातील.
4) गेल्या 14 दिवसांमध्ये तुम्ही कुठे प्रवास केला याबाबत प्रश्न विचारले जातील

वर उल्लेख केलेल्या प्रश्नांशिवाय अन्य प्रश्नही विचारले जातील. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुमच्यासमोर रिझल्ट येईल. त्यामध्ये तुम्हाला COVID-19 होण्याची किती शक्यता आहे, म्हणजे ‘रिस्क रेट’ दर्शवला जाईल. करोना व्हायरसबाबत आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्या माहितीच्या आधारावर ही टेस्ट असल्याचा उल्लेखही अ‍ॅपमध्ये करण्यात आलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio launches tool to let you check your symptoms for coronavirus this feature on the myjio app will available for all telecom network users sas
First published on: 25-03-2020 at 17:58 IST