Remove Blackness of Underarms: प्रत्येकाला स्लीव्हलेस कपडे घालायला आवडतात. मात्र, कधीकधी घामामुळे अंडरआर्म्स काळे होतात, ज्यामुळे लोक स्लीव्हलेस कपडे घालण्यास कचरतात. त्याच वेळी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत, जी लावल्यावर अंडरआर्म्स स्वच्छ होतात. परंतु, ही महाग असतात आणि त्यात रसायने असतात, ज्यांच्या वापराने कधीकधी त्वचेला खूप नुकसान पोहोचू शकते.
जर तुम्ही अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी स्वस्त आणि नैसर्गिक उपाय शोधत असाल तर ५ रुपयांची ही तुरटी एक उत्तम पर्याय असू शकते. येथे आम्ही तुम्हाला तुरटी वापरून अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय सांगू, जो तुम्ही फॉलो करू शकता.
तुरटी, जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असतेच. रोजच्या अनेक छोट्या-मोठ्या कामांमध्ये तुरटीचा वापर केला जातो. याच तुरटीचा वापर करून आपण आपलं सौंदर्य वाढवू शकता. दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी असते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जुन्या काळात सौंदर्यासाठी तुरटीचा वापर केला जायचा.
तुरटी आणि गुलाबपाणी वापरा
अंडरआर्म्स काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुरटी आणि गुलाबपाणीदेखील वापरू शकता. ते तयार करण्यासाठी एक चमचा तुरटी पावडर गुलाबपाण्यात मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. आता ते अंडरआर्म्सवर लावा. लावल्यानंतर सुमारे १० मिनिटे तसेच राहू द्या. आता हळूवारपणे घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते वापरू शकता.
तुरटी आणि लिंबाने काखेचा काळेपणा दूर करा
तुरटी आणि लिंबानेही काखेचा काळेपणा दूर करू शकता. हे तयार करण्यासाठी प्रथम तुरटी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. आता ते तुमच्या अंडरआर्म्सवर लावा. सुमारे १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा, यामुळे काळे डागदेखील सहज कमी होतात.
थेट तुरटी वापरा
जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही ते थेट वापरू शकता. अंघोळ केल्यानंतर ओल्या त्वचेवर तुरटीचा तुकडा हलकेच घासून घ्या, यामुळे घामाचा वास येत नाही आणि काखेचा काळेपणाही दूर होतो.