दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी आज (दि.30) आपल्या Galaxy M सीरिजमध्ये अजून एक फोन लाँच करणार आहे. कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M31s लाँच करेल. अन्य M सीरिज फोनप्रमाणे या फोनची किंमतही 15 ते 20 हजार रुपयांदरम्यान  असण्याची शक्यता आहे.

लाँचिंगआधीच या स्मार्टफोनच्या काही फीचर्सचा खुलासा झाला आहे. Samsung Galaxy M31s साठी एक माइक्रोसाइट सुरू करण्यात आली आहे. त्यावर या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असेल हे स्पष्ट झालं आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल क्षमतेचा असेल. कॅमेऱ्यासाठी सिंगल टेक फीचर देण्यात आलं आहे. याद्वारे एकावेळेस अनेक फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात असं सांगितलं जात आहे. 64MP प्राइमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल अल्ट्रा व्हिडिओ सेन्सर, 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स असा हा कॅमेऱ्यांचा सेटअप असेल. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेराही देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Samsung Galaxy M31s मध्ये फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाआहे. फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये होल-पंच कटआउट डिझाइन असेल. याशिवाय 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. 8GB आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंपनीने M सीरीजअंतर्गत Samsung Galaxy M30s आणि Samsung Galaxy M31 हे दोन फोन भारतीय बाजारात आणले आहेत.