सॅमसंग कंपनीचा ए सीरिजअंतर्गत Samsung Galaxy A80 स्वस्त झाला आहे. हा फोन कंपनीने जुलै महिन्यातच लाँच केला होता. या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातील रोटेटिंग कॅमेरा. रोटेटिंग असल्याने याचा कॅमेरा प्रायमरीसह सेल्फी कॅमेऱ्याचंही काम करतो. सॅमसंगने हा फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनलवर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनलवरील रिअर कॅमेरा सेटअपवर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनलवर येतो. पॅनलवर आल्यानंतर संपूर्ण रिअर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो, तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रिअर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.
फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोनमध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजीसह येतो, हा सेंसर एफ/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो. यात फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डॉल्बी अॅटम ऑडिओही देण्यात आला आहे. फोनमध्ये 3700 क्षमतेची बॅटरीही आहे.
आणखी वाचा- सहा कॅमेऱ्यांचा Vivo V17 Pro झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत
लाँचिंगवेळी या फोनची किंमत 47,990 रुपये होती. आता कंपनीने या फोनच्या किंमतीत आठ हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आता 39,900 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन नव्या किंमतीसह उपलब्ध आहे. हा फोन तीन रंगात अँजल गोल्ड, फँटम ब्लॅक आणि घोस्ट व्हाइटमध्ये उपलब्ध आहे.