संकष्टी चतुर्थीची प्रत्येक गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतो. संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजन करण्याचा दिवस असतो. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्यास दु:ख दूर होतात, अशी मान्यता आहे. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला म्हणजेच २२ डिसेंबरला संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी चंद्राचं पूजनाला विशेष महत्त्व आहे. मार्गशीष महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थीला २२ डिसेंबर बुधवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी सुरुवात होईल. तर २३ डिसेंबर गुरुवारी संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी समाप्ती असेल. चंद्रोदय २२ डिसेंबरला असल्याने संकष्टीचा उपवास २२ डिसेंबरला असेल. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी आहे. चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. यावेळी चंद्राला जल अर्पण करण्याचा विधी असतो.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी

  • सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान आणि धुतलेले कपडे परिधान करा
  • या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं
  • गणपतीची पूजा करताना आपलं मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं
  • गणपतीच्या मूर्तीची चांगल्या प्रकारे फुलांनी सजावट करा
  • पूजेत तीळ, गुळ, लाडू, फुलं, तांब्याच्या कळशात पामी, धूप, चंदन, प्रसादासाठी नारळ आणि केळी
  • पूजा करताना दुर्गा देवीची मूर्तीही जवळ ठेवल्यास शुभ मानलं जातं
  • गणपतीला गंध, फुल आणि जल अर्पण करा
  • संकष्टीला भगवान गणपतीला लाडू आणि मोदकांचा प्रसाद दाखवा
  • संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा वाचा
  • पूजा झाल्यानंतर आरती करा आणि नंतर प्रसाद वाटा

Astrology 2021: शुक्राची वक्री चाल सुरु; ‘या’ राशींच्या लोकांना जाणवणार प्रभाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा जप करा

  • “ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”
  • “गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा ​​भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”
  • “वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”