कर्करोग हा जीवघेणा आजार मानला जातो. जगातील बहुतांश लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. कर्करोगाचे निदान झाल्याने रुग्ण आणि त्याच्या कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण होते. कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. त्यापैकी बहुतेक पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये दिसतात. पण काही प्रकार फक्त स्त्रियांमध्येच दिसतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा त्यापैकी एक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. भारताने नुकतीच या कर्करोगाविरुद्ध स्वदेशी लस आणली आहे. लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे वेळीच निदान झाले, तर त्यावर योग्य मात करता येऊ शकते. त्यामुळे या कॅन्सरची कारणे, त्याची लक्षणे इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. खरं तर गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे काही काळानंतर दिसून येतात. परंतु लक्षणे दिसू लागताच, त्यावर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.

( हे ही वाचा: गरोदरपणात सेक्स केल्याने बाळाला त्रास होऊ शकतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात)

महिलांच्या गर्भाशयाच्या खालच्या भागाला सर्विक्स म्हणतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्त्रीच्या गर्भाशयाच्या पेशींवर परिणाम करतो. याला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग देखील म्हणतात. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, एडेनोकार्सिनोमा, मिश्रित कार्सिनोमा यांचा समावेश आहे.

जगभरात ६ लाखांहून अधिक महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या मते, दरवर्षी भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे एक लाख २३ हजार लाख रुग्णांचे निदान होते. त्याचप्रमाणे दरवर्षी ६७ हजार महिलांचा या कर्करोगाने मृत्यू होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. २०२० मध्ये जगभरात ६ लाखांहून अधिक महिलांना या कर्करोगाचे निदान झाले. त्यापैकी ३.४२ लाख महिलांचा या कर्करोगाने मृत्यू झाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, यापैकी ९० टक्के रुग्ण हे कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील होते.

गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे

गर्भाशयाचा कर्करोग होण्यासाठी साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे लागतात. म्हणून ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी या आजाराच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी पॅप स्मीअर चाचणी किंवा एचपीव्ही चाचणी करणे आवश्यक आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, २५ ते ६५ वयोगटातील महिलांनी या कर्करोगासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी दर पाच वर्षांनी किंवा तीन वर्षांनी चाचणी घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी न होता रक्तस्त्राव, प्रायव्हेट पार्ट्समधून व्हाईट डिस्चार्ज, अचानक वजन कमी होणे, प्रायव्हेट पार्टमधून दुर्गंधी येणे ही या कॅन्सरची प्रमुख लक्षणे आहेत.

( हे ही वाचा: Breast Cancer: खरंच? काळ्या रंगाची ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून सत्य)

गर्भाशयाच्या मुखाची कारणे

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे प्रतिकारशक्ती कमजोर असणे, गंभीर आजार असणे, एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत लैंगिक संबंध ठेवणे, पाच वर्षांहून अधिक काळ सतत गर्भनिरोधक गोळ्या घेणे, धूम्रपान हे महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक आहेत. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) चे विविध प्रकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी जबाबदार आहेत. शारीरिक संबंध हे या कर्करोगाचे प्रमुख कारण सांगण्यात येते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा लैंगिक संक्रमित आजार आहे. शारीरिक संपर्कातून हा विषाणू पुरुषांकडून महिलांमध्ये पसरतो. हा कर्करोग एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये जास्त करून आढळतो.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस उपलब्ध आहे

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारताने यासाठी स्वदेशी लस विकसित केली आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये इंडियन जर्नल ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. त्याच वेळी, एचपीव्ही लसीचा तीन वर्षे अभ्यास करण्यात आला. ही लस ९५.८ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि वुल्वर कर्करोगापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी ही लस प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

( हे ही वाचा: Hair Wash Periods: मासिकपाळी दरम्यान महिला केस धुवू शकतात का? जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी महिलांनी त्यांच्या प्रायव्हेट भागांच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. लक्षणे दिसू लागताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. महिलांची मासिक पाळी ठराविक वयानंतर थांबते. याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे सामान्य नसते. काही स्त्रियांना संभोगानंतर रक्तस्त्राव होतो. पण जर रक्तस्राव जास्त होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual intercourse major cause of cervical cancer know the methods of prevention gps
First published on: 16-10-2022 at 14:37 IST