Shani Margi November 2025: ज्योतिषशास्त्रात शनीदेव यांना ‘न्यायाची देवता’ आणि ‘कर्मफळदाता’ मानले जाते. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात, म्हणूनच त्यांना दंडाधिकारी देवताही म्हटलं जातं. शनीदेवाची चाल म्हणजे, त्यांचा वेग एखाद्या राशीवर पडणारा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर खोल परिणाम घडवतो असं मानलं जातं. सध्या शनीदेव मीन राशीत वक्री (retrograde) अवस्थेत आहेत आणि ही अवस्था २८ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार असल्याचं ज्योतिषीय गणनात सांगितलं गेलं आहे. या दिवशी शनीदेव वक्री चाल सोडून मार्गी चाल म्हणजेच सरळ दिशा धारण करतील.

‘शनी मार्गी’ म्हणजे नेमकं काय?

जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो, म्हणजेच तो आकाशात उलट्या दिशेने फिरत असल्यासारखा दिसतो, तेव्हा त्याचा परिणाम काहीसा विलंब, अडथळे किंवा आत्मचिंतनाशी जोडला जातो. पण, शनी मार्गी झाल्यानंतर तो ग्रह पुन्हा सरळ दिशा घेतो आणि ही चाल जीवनात स्थैर्य, प्रगती आणि नवी ऊर्जा आणते असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

नोव्हेंबरमध्ये शनीची दिशा बदलणार… कोणाच्या आयुष्यात येणार ‘सुवर्ण काळ’?

२८ नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होताच काही राशींच्या आयुष्यात नव्या संधी, नवे दरवाजे आणि नवं तेज खुलं होण्याची शक्यता आहे. खाली दिलेल्या तीन राशींना हा बदल विशेष अनुकूल ठरू शकतो, असं ज्योतिष गणन सुचवतं.

मेष (Aries): मेहनतीचं सोनं होणार!

मेष राशीच्या लोकांनी गेल्या काही महिन्यांपासून जेवढी धावपळ केली, त्या प्रयत्नांचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. नोकरीत अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांना हिरवा कंदील मिळू शकतो. आर्थिक स्थैर्य वाढताना दिसेल आणि जुने व्यवहार सुलभतेने पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ (Aquarius): आर्थिक स्थिरतेचा काळ!

कुंभ राशींसाठी शनी मार्गी होणे अत्यंत आशादायक ठरू शकते. अनेक दिवसांपासून थांबलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अचानक फायद्याचे व्यवहार हाताशी येऊ शकतात. नातेसंबंधातील गैरसमज दूर होतील आणि आरोग्यही पूर्वीपेक्षा सुधारेल.

मीन (Pisces): प्रगतीचा नवा अध्याय सुरू!

मीन राशीवर सध्या शनीदेव स्वतःच विराजमान आहेत, त्यामुळे त्यांची मार्गी चाल या राशीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कामकाजात स्पष्टता येईल, करिअरमध्ये नवी दिशा मिळू शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात आनंद आणि मानसिक शांती अनुभवता येईल.

तारतम्य राखा… हे फक्त ज्योतिषशास्त्रीय संकेत!

हे सर्व विश्लेषण ज्योतिषशास्त्रीय गणनांवर आधारित असून, त्याला भविष्यवाणी म्हणून घेऊ नये. ग्रहांच्या गतीचा परिणाम प्रत्येकाच्या कुंडलीतील स्थानावर अवलंबून असतो, तरीही नोव्हेंबरच्या अखेरीस शनीचा हा बदल अनेकांसाठी नव्या आशेची किरणे घेऊन येईल, असं म्हणायला हरकत नाही.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)