What Are The 9 Days Colors Of Navratri : उद्यापासून नवरात्री सुरु होईल. आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीचे आगमन होते. प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. उद्या घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते.
यंदा २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहेतर १ ऑक्टोबरला दसरा असणार आहे. नवरात्री सणाची माहिती सांगताना त्यात नऊ रंगांचा उल्लेख आवर्जून केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस, गरबा- दांडियाला एकाच रंगात सजून आलेल्या तरुणी, महिलांची गर्दी दिसते. तर यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याबद्दल जाणून घ्यायला तुम्हीही उत्सुक असाल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
नवरात्रीचे नऊ रंग (Navratri 2025 Dates And Colors )
- प्रतिपदा – २२ सप्टेंबर २०२५ – पांढरा रंग (सोमवार )
- द्वितीया – २३ सप्टेंबर २०२५ – लाल रंग (मंगळवार )
- तृतीया – २४ सप्टेंबर २०२५ – निळा रंग (बुधवार)
- चतुर्थी – २५ सप्टेंबर २०२५ – पिवळा रंग (गुरुवार)
- पंचमी – २६ सप्टेंबर २०२५ – हिरवा रंग (शुक्रवार)
- षष्टी – २७ सप्टेंबर २०२५ – राखाडी रंग (शनिवार )
- सप्तमी – २८ सप्टेंबर २०२५ – केशरी रंग (रविवार)
- अष्टमी – २९ सप्टेंबर २०२५ – मोरपंखी रंग (सोमवार )
- नवमी – ३० सप्टेंबर २०२५ – गुलाबी रंग (मंगळवार)
नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे का घालायचे? (Why Wear Nine Colors in Navratri)
नवरात्रीत नऊ रंगाचे कपडे घालायचे की नाही हे संपूर्ण तुमच्या आवडीवर अवलंबून असते. मात्र सणांच्या दिवसात एकोपा आणि आपण समाज म्हणून किती जोडलेले आहोत याला महत्त्व असतेच. आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशाप्रकारे नऊ रंगांचे कपडे घातले जातात.
शारदीय नवरात्र २०२५ शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर (सोमवार) रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटांपासून सुरू होईल आणि २३ सप्टेंबर (मंगळवारी) रोजी २ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल.
तर यंदा तुम्हीही नऊ रंगाचे कपडे घाला आणि नवरात्र साजरी करा.