Navratri 2025: नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात दुर्गेच्या नऊ रूपांची त्यांच्या आवडत्या नैवेद्यासह मनोभावे पूजा-अर्चा केली जाते. ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात, त्यांच्या मुलींची नावे दुर्गेच्या नावावर आवर्जून ठेवतात. दुर्गेच्या नावावर मुलीचे नाव ठेवल्याने कायम देवीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते.
मुली असतात देवीचे रूप
भारतीय संस्कृतीत मुलीला देवीचे रूप मानले जाते. ती निर्मिती, करूणा आणि शक्तीचे प्रतीक आहे. मुलीचा जन्म हा घरात देवी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचे आगमन म्हणून पाहिला जातो. अनेक जण त्यांच्या मुलींची नावे देवींच्या नावावर ठेवतात. तेव्हा तुमच्या घरी जर या नवरात्रीत कन्यारत्न आले असेल किंवा होण्याची अपेक्षा असेल, तर तिचे नाव देवीच्या या नावांवर ठेवू शकता.
१. आद्या- मुलीचे नाव आद्या ठेवू शकता. याचा अर्थ आद्यशक्ती. हे दुर्गेच्या प्रमुख नावांपैकी एक आहे.
२. देवयानी- दुर्गेला देवयानी असेही म्हटले जाते. हे नाव शक्ती, दिव्यता आणि श्रेष्ठतेचे प्रतीक आहे. याचा अर्थ देवांचा रथ आणि समृद्धीची देवी असा आहे.
३. वैष्णवी- वैष्णवी हे दुर्गा देवीचे सर्वात लोकप्रिय नाव आहे. तुम्ही हे नाव तुमच्या मुलीला देऊ शकता. या नावाचा अर्थ भगवान विष्णूची शक्ती करणारा असा होतो.
४. वामिका- वामिका हे अतिशय सुंदर नाव आहे. वाम हा शब्द भगवान शिवाशी संबंधित आहे. वामिका म्हणजे शिवाची पत्नी म्हणजेच देवी पार्वती.
५. कात्यायनी- नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी दुर्गेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी ऋषी कात्यायनाच्या तपश्चर्येतून देवी दुर्गेने राक्षसांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला. तुम्ही तुमच्या मुलीचे हे नाव ठेवू शकता.
६. शैलजा- याचा अर्थ पर्वताची कन्या म्हणजेच हे देवी पार्वतीचे नाव आहे.
७. सिद्धीदा- हे नाव सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या देवी दुर्गेच्या रूपांपैकी एक आहे. याचा अर्थ पूर्ण शक्ती देणारी असा आहे.
८. त्रिपुरा- हे नाव त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या देवी दुर्गेच्या रूपाशी संबंधित आहे. याचा अर्थ तिन्ही लोकांचे रक्षक असा होतो.
९. महेश्वरी- म्हणजे महेश (भगवान शंकर)च्या शक्तीने युक्त देवी. हे नाव पारंपरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे सुंदर आहे.
१०. त्रिपुरा सुंदरी- म्हणजे तिन्ही लोकांची सुंदर देवी. हे नाव शक्ती, सौंदर्य आणि देवत्वाचे प्रतीक आहे.
दुर्गा देवीची नऊ रूपे
शैलपुत्री- हिमालयाची कन्या, शक्ती आणि स्थिरतेची देवी
ब्रम्हचारिणी- तप आणि ज्ञानाची देवी
चंद्रघंटा- धैर्य आणि शौर्याचे प्रतीक
माँ कुष्मांडा- विश्वाची निर्मिती करणारी देवी
स्कंदमाता- कार्तिकेय यांची आई
कात्यायनी- युद्ध आणि दुष्टांचा नाश करणारी देवी
कालरात्री- अंधार आणि दुष्टांचा नाश करणारी देवी
महागौरी- शांती आणि सौंदर्याची देवी
सिद्धिदात्री- यश आणि समृद्धी देणारी देवी