Why sharing your toothbrush is a very bad idea : ‘शेअरिंग इज केअरिंग’ हे वाक्य आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण, जेव्हा टूथब्रशचा प्रश्न येतो तेव्हा ही म्हण कदाचित खरी ठरणार नाही. तुम्ही जर तुमच्या जोडीदाराबरोबर टूथब्रश शेअर करत असाल तर वेळीच थांबा. कारण तुमच्या जोडीदाराबरोबर टूथब्रश शेअर करणे हानिकारक ठरू शकते. कारण याचा तुमच्या दोघांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण तुमच्या तोंडात चांगले, वाईट अशा दोन्ही प्रकारच्या जीवाणूंचा समावेश असतो. जेव्हा तुम्ही टूथब्रश एकमेकांबरोबर शेअर करता, तेव्हा तुम्ही या जीवाणूंची जोडीदाराबरोबर देवाणघेवाण करत आहात हे वेळीच लक्षात घ्या.

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने डॉक्टर करिश्मा आणि एस्थेटिक्स येथील कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉक्टर निशा ठक्कर यांच्याशी संवाद साधला आणि तेव्हा त्या म्हणाल्या की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर टूथब्रश (Toothbrush) शेअर करणे अगदी जवळचे वाटू शकत असले तरीही असे केल्याने तुमच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

तुम्ही टूथब्रश का शेअर करू नये हे समजून घेऊया :

बॅक्टेरियाची अदलाबदली : दात घासल्यानंतर टूथब्रशमध्ये (Toothbrush) हिरड्यांचे रोग, पोकळी आणि त्याहूनही अधिक गंभीर संक्रमणांसाठी जबाबदार असलेल्या जीवाणूंचा समावेश असतो. टूथब्रश शेअर केल्याने हे बॅक्टेरिया तुमच्या जोडीदाराच्या तोंडात जाऊ शकतात. डॉक्टर निशा ठक्कर यांनी स्पष्ट केले की, ‘स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स’ नावाचा हानिकारक जीवाणू जो दात किडण्यासाठी जबाबदार आहे, तो टूथब्रशवर आढळू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही टूथब्रश शेअर करता, तेव्हा तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असू शकते.

संसर्गाचा वाढता धोका : तोंडातील काही जीवाणूंमुळे न्यूमोनियासारखा आजार होऊ शकतो. टूथब्रश शेअर केल्याने या जीवाणूंचा पसरण्याचा धोका वाढू शकतो.

व्हायरल ट्रान्समिशन : काही विषाणू लाळेद्वारे तुमच्या जोडीदाराच्या तोंडात जाऊ शकतात आणि सर्दी किंवा फ्लू सारखे आजार होऊ शकतात.

हेही वाचा…Whiteheads vs Blackheads: व्हाईटहेड्स व ब्लॅकहेड्स जातंच नाहीत? महागडे स्क्रब सोडा, ‘हे’ पाच घरगुती उपाय नक्की फॉलो करा

डॉक्टर निशा ठक्कर म्हणतात की, काही वेळा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो, जो पटकन लक्षात येत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत टूथब्रश शेअर करतो तेव्हा एचआयव्ही, हेपेटायटीस बी सारखे रक्तप्रवाहाचे आजारदेखील हस्तांतरित होऊ शकतात.

तसेच डॉक्टर निशा ठक्कर म्हणतात की, टूथब्रश (Toothbrush) शेअर करणे हे रोमँटिक वाटत असले तरीही प्रेम व्यक्त करण्यासाठी, नाते टिकवून ठेवण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत; जे पुढे लिहिण्यात आले आहेत…

नियमित दात तपासणे : तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जोडीदारांनी नियमित दात तपासण्याला प्राधान्य द्या.

तोंडाची स्वच्छता : तुमच्या तोंडातील जीवाणू कमी करण्यासाठी सातत्याने ब्रश, फ्लॉसिंग आणि माउथवॉश करा.

चुंबन घेणे (किस) आणि मिठी मारणे : जोडीदाराचे चुंबन घेणे, त्याला मिठी मारणे हे कनेक्ट करण्याचा सुरक्षित, आनंदी मार्ग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे, टूथब्रश (Toothbrush) शेअर करणे ही एक रोमँटिक कृती वाटत असली तरीही हे आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा टूथब्रश वापरणे सोयीस्कर ठरेल. तसेच तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी टूथब्रश नियमित बदलणेदेखील आवश्यक आहे. असे केल्यावर तुम्ही स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता आणि आजारांपासून दूर राहू शकता.