Fruit Juice vs Vegetable Juice: Which Is Better For Weight Loss?: दररोज फळांच्या भाज्यांच्या रसाचं सेवनं आपल्या आरोग्य दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनले आहे. मग सकाळी ग्रीन डिटॉक्स ड्रिंक असो किंवा वर्कआउटनंतरचा फळांचा रस. भाज्या, फळं, तृणरस असं सगळं सरसकट पिणं म्हणजेच डाएट असं अनेकांना वाटतं, मात्र ते आपल्याला पचतंय की नाही हे कोण कसं ठरवणार?

फळे आणि भाज्यांचा रस एकत्र का काढू नये?

आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांच्या मते, फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर खूप असते. दुसरीकडे भाज्यांच्या रसांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटक असतात त्यात बहुतेकदा साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. या दोघांचा एकत्र रस घेतल्यास, फळे भाज्यांच्या पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तुमच्या भाज्यांचे आरोग्य फायदे कमी होऊ शकतात, म्हणून तज्ज्ञांनी फळे आणि भाज्यांचा रस एकत्र न करण्याचा सल्ला दिला आहे आणि अधिक पौष्टिकतेसाठी निवडक भाज्यांचा रस प्यायची शिफारस केली आहे.

हिरव्या भाज्यांचा रस एकत्र घ्यावा का?

पालक, मेथी, इतर पालेभाज्या एकाच सुपर ज्यूसमध्ये मिसळणे ही चांगली कल्पना वाटू शकते, पण तज्ज्ञांच्या मते ते मिश्रण टाळले पाहिजे; कारण पालेभाज्यांमध्ये बहुतेकदा ऑक्सलेट्स असतात. या मिश्रणामुळे कालांतराने किडनी स्टोन तयार होऊ शकतात, म्हणून हिरव्या भाज्या तुमच्यासाठी उत्तम असल्या तरी सर्वच भाज्यांचा रस एकत्र केल्याने तुमच्या शरीराला फायदा होण्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही त्याचा रस मोठ्या प्रमाणात पित असाल.

फळांचा रस की भाज्यांचा रस; वजन कमी करण्यासाठी कोणता चांगला आहे?

आता तुम्हाला वाटेल की फळांचा रस आणि भाज्यांचा रस वेगवेगळे तुमच्या आहारासाठी चमत्कार करू शकतात, पण पुन्हा विचार करा. जरी दोन्ही चांगले आणि पौष्टिक पर्याय असले तरी त्यापैकी फक्त एकच वजन कमी करण्यासाठी चांगला आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया..

फळांमध्ये भरपूर नैसर्गिक साखर असते आणि काही फळांचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते. परंतु, जेव्हा वजन कमी करण्याचा किंवा कॅलरीज मर्यादित करायच्या असतील तेव्हा भाज्यांचा रस फायदेशीर ठरू शकतो. कारण फळे नैसर्गिकरित्या गोड असतात आणि त्यामुळे त्याच्यात कॅलरीज जास्त असतात. भाज्यांचे रस शरीराचे पीएच संतुलन राखण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रणालीस चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे नसेल, परंतु सामान्यतः प्रश्न पडत असेल की फळे आणि भाज्यांपैकी कोणता रस आरोग्यदायी आहे, तर उत्तर असे आहे की ते दोन्हीही मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास निरोगी असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळे आणि भाज्या दोन्हीमध्ये विविध प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. साधारणपणे रस काढण्यापेक्षा फळे आणि भाज्या तसेच खाणे आरोग्यदायी ठरते.