Never Eat These Food Items With Tea: “चहा म्हणजे जीव की प्राण “, “सकाळी उठल्यावर एक कप चहा नाही घेतला तर मला बाई कसतरीच होतं, काही सुचतच नाही”, आज खूप डोकं दुखतंय चहा घेऊ”, “आज मस्त पाऊस पडेल असं वाटतंय, चला एक एक कटिंग घेऊ”, चहा पिण्याची गरज अशा कितीतरी वाक्यांमधून आजपर्यंत तुम्हीही ऐकली असेल ना? चहामुळे खरोखरच आपल्याला काही फायदा होतो का की फक्त मूड सुधारण्यासाठी चहा कामी येतो यावर अनेकांनी वेगवेगळी मते दिली आहेत. पण सगळ्याच तज्ज्ञांचं काही मुद्द्यांवर मात्र एकमत आहे. तो मुद्दा म्हणजे चहाबरोबर काय खाऊ नये? अनेकदा आपल्याला चहा प्यायल्यावर अचानक करपट ढेकर येऊ लागतात, कधी ऍसिडिटी वाढते, या सगळ्याचं खापर चहावर फोडलं जात असलं तरी काही वेळा आपण चहाच्या जोडीला खाल्लेला बिस्कीटाचा पुडा, भज्या याच ऍसिडिटीचं कारण ठरू शकतात. आज आपण आहारतज्ज्ञ गौरी आनंद, संस्थापक @balancedbitesbygauri यांनी सांगितल्याप्रमाणे चहाचे सेवन करताना नेहमी टाळाव्या अशा ६ पदार्थांची यादी पाहणार आहोत.

चहाबरोबर चुकून खाऊ नका हे ६ पदार्थ

लिंबूवर्गीय फळे

चहामध्ये लिंबाचा तुकडा घालणे फायदेशीर ठरू शकते, परंतु चहाच्या जोडीने मोठ्या प्रमाणात लिंबूवर्गीय फळांचे (संत्री, मोसंबी) सेवन केल्याने पचन समस्या उद्भवू शकतात. या फळांमध्ये जास्त आंबटपणा असल्यामुळे चहामधील टॅनिनसह ते छातीत जळजळ किंवा अपचन वाढवू शकतात. तसेच फळांमधील किंचित तुरटपणा पचनमार्गात त्रास होऊ शकतो.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Improve Gut Health
आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या
Puneri Pati Puneri Poster Goes Viral On Social Media
Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच
How Do Shopkeepers Cheat Desi Jugaad Video Viral on social Media
फळ-भाजी विक्रेते तराजूने कशी फसवणूक करतात बघा; पुढच्या वेळी नुकसान टाळायचं असेल तर ‘हा’ VIDEO पाहाच
Kitchen jugad video Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon kitchen tips
Kitchen Jugaad: पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक

लोहयुक्त पदार्थ

पालक, लाल मांस आणि शेंगा यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर लोह असते, जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असते. पण, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स ही संयुगे असतात, जे नॉनहेम लोह (वनस्पती-आधारित पदार्थ आणि पूरक पदार्थांमध्ये आढळणारे लोहाचे प्रकार) शोषण्यास अडथळा निर्माण करू शकतात. लोहाचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी आपण चहाच्या वेळेव्यतिरिक्त या पदार्थांचे सेवन करावे.

मसालेदार पदार्थ

चहाबरोबर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास वाढू शकतात. चहामधील टॅनिन पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात आणि मसालेदार पदार्थांतील कॅप्सॅसिनसह मिसळल्यास पोटात आम्लता, अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.

अधिक कॅल्शियम असणारे पदार्थ

विशिष्ट पालेभाज्या (उदा. केल, कोलार्ह, रव्या भाज्या) हे पदार्थ अधिक कॅल्शियमयुक्त असतात. हेच कॅल्शियम अँटिऑक्सिडंट्सना बांधायचे काम करते त्यामुळे कॅटेचिनसारख्या घटकांच्या शोषणात व्यत्यय येऊ शकतो. चहाबरोबर हे पदार्थ खाल्ल्याने त्याचा फायदा शरीराला मिळतच नाही.

प्रक्रिया केलेल्या साखरेचे पदार्थ

प्रक्रिया केलेल्या पदार्थामुळे किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे ग्लायसेमिक भार वाढतो परिणामी रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते. चहामध्ये सुद्धा साखर असते अशावेळी चहा आणि वर स्नॅक्समधील साखर असे प्रमाण जास्त झाल्यास मेटाबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.

हे ही वाचा<< ‘मुंज्या’तील पम्मी म्हणजे मोना सिंगने १५ किलो वजन कमी वेळात घटवलं! वजन कमी करताना व्यायाम व झोप किती असावी? डॉक्टरांकडून ऐका

थंड पदार्थ

गरम चहाबरोबर थंड पदार्थ अजिबातच खाऊ नयेत. कारण विरोधाभासी तापमान पचनक्रियेत व्यत्यय आणू शकते. एकाच वेळी वेगवेगळ्या तापमानाचे अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते आणि मळमळ होऊ शकते. हे टाळण्यासाठी, दोन्हीच्या सेवनात किमान ३० मिनिटांचे अंतर ठेवा.

चहाचे विविध प्रकार आणि त्यांची अन्नासह होणारी प्रतिक्रिया

१) आनंद सांगतात की, “ चहाचा मूळ प्रकार म्हणजे काळ्या चहामध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लोहाचे शोषण होण्यात व्यत्यय येतो आणि लोहयुक्त किंवा जास्त आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्यास पाचन समस्या निर्माण होतात.”

२) दुसरा चहाचा प्रकार म्हणजे ग्रीन टी ज्याची किंचित कडू चव असते आणि त्यात मध्यम प्रमाणात टॅनिन असते. हलके, ताजे पदार्थ जसे की सॅलड्स आणि मासे यांच्यासह ग्रीन टीचे सेवन फायद्याचे ठरू शकते पण उच्च अँटिऑक्सिडेंट टिकवून ठेवण्यासाठी ग्रीन टी दुग्धजन्य पदार्थांसह घेणे टाळा.

३) तिसरा प्रकार म्हणजे हर्बल टी ज्या सामान्यतः कॅफीन-मुक्त असतात. हर्बल टीबरोबर साधारण अनेक पदार्थ खाता येऊ शकतात याचा विपरीत असा परिणाम शक्यतो होत नाही. पण हर्बल टीची चव सौम्य असते त्या चवीला मात देईल असे तीव्र चवीचे पदार्थ खाणे टाळा.