Six step medsrx formula to prevent cancer risk: कर्करोग हा असा आजार आहे की, एकदा तो एखाद्याला झाला की, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कर्करोगाचे नाव ऐकताच लोक जीवन लवकर संपुष्टात येण्याच्या भीतीने आत्मविश्वास गमावून बसतात. कारण कर्करोगाचे वेळेवर निदान होणे आणि वेळेवर उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. गेल्या काही दशकांमध्ये, कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि दरवर्षी अनेक लोक कर्करोगामुळे आपले प्राण गमावत आहेत. कर्करोगाची मुख्य कारणे म्हणजे बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अस्वास्थ्यकर खाण्या-पिण्याच्या सवयी. मात्र, जर तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवली, तर तुम्ही अशा गंभीर आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकता. कर्करोग तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी एका पॉडकास्टमध्ये एक सोपे सूत्र सांगितले आहे, ज्याचे पालन केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो. त्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत.
MEDSRX सूत्र काय आहे?
डॉ. तरंग कृष्णा यांनी ‘मेडएसआरएक्स’ नावाच्या ६-चरणांच्या सूत्राबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की हे सूत्र तुमच्या जीवनशैलीत समाविष्ट करणे खूप सोपे आहे. जर तुम्ही हे सूत्र नियमितपणे पाळले, तर तुम्ही आयुष्यभर कर्करोगाचा धोका टाळू शकता. MEDSRX हे एक संक्षिप्त रूप आहे आणि प्रत्येक अक्षराचा अर्थ वेगळा असतो आणि तो दैनंदिन जीवनात सहजपणे स्वीकारता येतो.
‘एम’ म्हणजे ध्यान
डॉ. तरंग यांच्या मते, M म्हणजे मेडिटेशन, जे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सततचा ताण रोगप्रतिकार शक्ती कमी करतो. अशा परिस्थितीत दररोज काही वेळ शांत बसून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा ध्यान करणे महत्त्वाचे आहे.
‘ई’ म्हणजे व्यायाम
E म्हणजे व्यायाम. तुम्ही दररोज नक्कीच काही ना काही व्यायाम केला पाहिजे. जर तुम्हाला योगा आवडत असेल, तर योगा करा. जर तुम्हाला जिमला जायचे असेल, तर जिमला जा. जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल, तर जलद चाला किंवा १०,००० पावले चालण्याचे लक्ष्य पूर्ण करा. एकंदरीत शरीर सक्रिय ठेवणे आणि दररोज घाम येणे महत्त्वाचे आहे.
‘डी’ म्हणजे डाएट
D म्हणजे डाएट. डॉ. तरंग यांच्या मते, आहार शक्य तितका स्वच्छ आणि संतुलित असावा. शाकाहारी अन्न अधिक फायदेशीर आहे. जर तुम्ही मांसाहारी अन्न खात असाल, तर चिकन आणि मासे हे चांगले पर्याय आहेत; परंतु कोणत्याही प्रकारचे लाल मांस खाणे टाळा.
R म्हणजे रीलेशनशीप
R म्हणजे रीलेशनशीप. नातेसंबंधांचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. जर तुमच्याकडे असे लोक असतील, ज्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या मनातील भावना शेअर करू शकता, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक आनंदी असता. याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर तुमचे नाते चांगले नसेल, तर आयुष्यात दुसरे काहीही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून चांगल्या नात्यांवर लक्ष केंद्रित करा आणि प्रयत्न करा.
‘X’ म्हणजे एक्स फॅक्टर
एक्स म्हणजे एक्स फॅक्टर. या सूत्रातील शेवटची पायरी म्हणजे एक्स फॅक्टर, ज्याचा अर्थ स्वतःला आनंदी ठेवणे आणि उद्देशपूर्ण जीवन जगणे, असा होतो. डॉ. तरंग यांच्या शब्दांत सांगायचे तर, एक्स फॅक्टर म्हणजे तुम्ही जे काही करता किंवा तुम्हाला आनंद देणारा छंद. तो तुमचा आवडता छंद असू शकतो किंवा एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवणे असू शकते. एकंदरीत, जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवता तेव्हा तुमचे शरीरदेखील तुमच्यावर आनंद व्यक्त करीत असते. या सोप्या, पण प्रभावी सूत्राचे पालन केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.: