scorecardresearch

Skin Care: पाठीच्या पिंपल्समुळे बॅकलेस घालता येत नाही? या सोप्या टिप्सच्या मदतीने दूर करा समस्या

पाठीच्या पुरळांमुळे त्वचेच्या सौंदर्यालाच इजा होते असे नाही, तर या फोडांमुळे वारंवार खाज सुटते.

back acne pimples
हे पिंपल्स पाठीचे सौंदर्य बिघडवतात. (Photo : Freepik)

चेहऱ्यावर पुरळ येण्यास सुरुवात झाली तर चेहऱ्याच्या सौंदर्यावर खोलवर परिणाम होतो, परंतु काहीवेळा पाठीवर फोड आणि पिंपल्स देखील येऊ लागतात, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण ज्या महिलांना बॅकलेस ड्रेस घालणे आवडते त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हे पिंपल्स पाठीचे सौंदर्य बिघडवतात, त्यामुळे लग्न आणि पार्ट्यांमध्ये ते झाकून ठेवावे लागतात.

पाठीच्या पुरळांमुळे त्वचेच्या सौंदर्यालाच इजा होते असे नाही, तर या फोडांमुळे वारंवार खाज सुटते. सार्वजनिक ठिकाणी पाठ खाजवल्याने लोकांमध्ये आपली छाप खराब होते. आज आपण अशा काही उपायांबद्दल जाणून घेऊया ज्याने आपण या समस्येवर मात करू शकतो.

कोरफड :

आपल्या सर्वांना माहिती आहे की एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, म्हणूनच अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. पाठीवरील पुरळ दूर करण्यासाठी कोरफडीचे पान तोडून त्याचे जेल काढा आणि काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. आता हे थंड जेल प्रभावित भागावर लावा आणि सुमारे अर्धा तास सोडा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Mangoes in India : जाणून घ्या, भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती आणि त्यांना ओळखायची पद्धत

मध आणि दालचिनी :

मध आणि दालचिनी एकत्र करून एक पॅक तयार करा. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत जे फोड आणि मुरुम दूर करण्यास मदत करतात. एक चमचा मध आणि दालचिनी पावडर एकत्र करून १५ मिनिटे पाठीवर लावून ठेवा.

ग्रीन टी :

ग्रीन टीचा वापर अनेकदा वजन कमी करण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्वचेची काळजी घेण्यासाठी हा एक उत्तम उपचार आहे. यासाठी एक कप ग्रीन टी तयार करा, त्यात कापसाचे गोळे बुडवून पाठीवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर त्वचा धुवा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Skin care cant wear backless because of back pimples troubleshoot with these simple tips pvp

ताज्या बातम्या