scorecardresearch

Premium

Mangoes in India : जाणून घ्या, भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती आणि त्यांना ओळखायची पद्धत

भारतात सुमारे आंब्याच्या १५०० जाती आढळतात आणि प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे.

varieties of mangoes in india
आंब्यांच्या अशाच १५ प्रसिद्ध जातींबद्दल जाणून घेऊया. (Photo : Pixabay)

आंबा म्हणजे गोड, रसाळ फळांचा राजा. भारतात सुमारे आंब्याच्या १५०० जाती आढळतात आणि प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे. गुलाबी लाल असा गुलाब खास किंवा सिंधुरा, पोपट चोचीच्या आकाराच्या तोतापुरी, तसेच सुमारे ३०० ग्रॅम वजनाचा प्रसिद्ध रत्नागिरी हापूस आणि बिहारमधील मालदा ज्याचा एक अनोखा सुगंध आहे. अशा आंब्याच्या अनोख्या जाती भारतीय बाजारपेठांवर एप्रिल मध्य ते ऑगस्ट या कालावधीत राज्य करतात. आंब्यांच्या अशाच १५ प्रसिद्ध जातींबद्दल जाणून घेऊया.

१. तोतापुरी

चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील, हा आंबा असाच खाण्यासोबतच तो सलाड आणि लोणच्यासाठीही उत्तम आहे.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

कसे ओळखावे: पिकल्यावर आंबा हिरवट रंगाचा असतो आणि पोपटाच्या चोचीसारखे दिसतो.

२. हापूस

मूळ महाराष्ट्रातील हा आंबा,आता गुजरात आणि कर्नाटकच्या काही भागातही मिळतो. आंब्याची ही प्रजात फारच लोकप्रिय असून हा आंबा सर्वात महाग विकला जातो आणि जगातील इतर भागांमध्ये देखील निर्यात केला जातो.

कसे ओळखावे: साल भगव्या रंगाचे असते आणि त्याला नैसर्गिक वेगळा सुगंध असतो.

३. सिंधूरा

या आंब्याची चव आंबट-गोड असून याची चव तुमच्या तोंडात बराच काळ रेंगाळेल. शेक तयार करण्यासाठी हे खूप चांगले आहे, कारण गर छान पिवळ्या रंगाचा आहे.

कसे ओळखावे: हा आंबा दिसायला वेगळा असून त्याची साल बाहेरून लाल आणि पिवळी असते.

बार, पब आणि क्लबमधील नेमका फरक तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या त्यांच्यातील वेगळेपण

४. बंगीनापल्ली

हापूस आंब्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे केले जाते. त्याचा सुगंध खूप मोहक असून, ते गुळगुळीत सालीसह अंडाकृती आकाराचे असतात आणि त्यांची लांबी सुमारे १४ सेमी असते.

कसे ओळखावे: त्याची साल पिवळसर रंगाची असून त्यावर काही डाग असतात आणि फळ अंडाकृती आकाराचे असते.

५. रत्नागिरी

प्रसिद्ध ‘रत्नागिरी आंबा’ हा रत्नागिरी, देवगड, रायगड आणि कोकण या भागात आढळतो आणि विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याचे वजन सुमारे १५० ते ३०० ग्रॅम असते. अल्फोन्सो आंबा हा भारतात आढळणाऱ्या आंब्याच्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहे आणि सर्वात महाग देखील आहे.

कसे ओळखावे: फळाच्या वरच्या बाजूला लाल रंगाची छटा असते ज्यामुळे ही जात सहज ओळखता येते.

६. चौसा

उत्तर भारत आणि बिहारमध्ये ही लोकप्रिय जात शेरशाह सूरीने सोळाव्या शतकात त्याच्या कारकिर्दीत आणली होती. ह्या जातीला बिहारमधील एका शहराचे नाव दिले गेले आहे. हा आंबा पिवळ्या-सोनेरी रंगाचा असतो.

कसे ओळखावे: त्याच्या पिवळ्या-सोनेरी रंगाने सहज ओळखता येते.

७. रासपुरी

कर्नाटकातील जुने म्हैसूर येथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जाणारी ही जात भारतात आंब्याची राणी म्हणून ओळखली जाते. ही मे महिन्यात येते आणि जूनच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होते. दही, स्मूदी आणि जामच्या मध्ये ह्याचा उत्तम वापर केला जातो.

कसे ओळखावे: ते अंडाकृती आकाराचे आणि सुमारे ४ ते ६ इंच लांब असतात.

Summer Tips : वीजेशिवायही उन्हाळ्यात घर ठेवता येणार थंड; ‘या’ टिप्सचा वापर ठरेल उपयुक्त

८. पायरी

पायरी ही बाजारपेठेतील पहिल्या जातींपैकी एक आहे. सालीला तांबूस रंगाची छटा आणि चवीला आंबट असे हे फळ गुजरातमध्ये आमरस बनवण्यासाठी जास्त वापरतात.

कसे ओळखावे: सालीवर लाल रंगाची छटा.

९. हिमसागर

गोड सुगंध आणि पश्चिम बंगाल, ओरिसाची खासियत असलेलं हे फळ मध्यम आकाराचे असून त्याचे वजन २५०-३५० ग्रॅम दरम्यान असते आणि हे डेझर्ट आणि शेक बनवण्यासाठी वापरले जाते.

कसे ओळखावे: ते सहसा मध्यम आकाराचे, पिवळ्या सालीसह हिरव्या रंगाचे असतात.

१०. नीलम

ही जात देशाच्या प्रत्येक भागात पिकवली जाते. सामान्यतः जूनमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. नारिंगी सालीसह, हे इतर जातींच्या तुलनेत लहान असतात.

कसे ओळखावे: त्यांची साल केशरी असते आणि आंब्याच्या इतर जातींच्या तुलनेत आकाराने लहान असते.

११. मालगोवा

मालगोआ हा एक गोल आंबा आहे ज्यावर पिवळ्या छटासह हिरवा रंग असतो. त्याचा आकार तिरकस गोलाकार असतो, गर हलका पिवळा असतो आणि हे आंबे बहुतेक मे आणि जूनमध्ये उपलब्ध होतात.

कसे ओळखावे: ३००-५०० ग्रॅम वजनाचा लहान तिरकस गोलाकार आकार

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

१२. मालदा

बिहारमधील ‘आंब्याचा राजा’ म्हणून ओळखले जाणारा मालदा आंबा चवीला गोड-आंबट असून तो रसाळ आणि स्वादिष्ट आहे.

कसे ओळखावे: इतर प्रकारच्या आंब्यांच्या तुलनेत त्याचे आवरण पातळ असते आणि त्याला गोड सुगंध असतो.

१३. लंगडा

लंगडा हा आंब्याची एक प्रसिद्ध जात आहे, जिचा उगम उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला आहे. पाय नसलेल्या माणसाच्या शेतात पहिल्यांदा त्याची लागवड केली गेली होती, म्हणून या आंब्याच्या जातील लंगडा म्हणतात. ते जुलै ते ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होतात.

कसे ओळखावे: अंडाकृती आकाराचे असून ते पिकलेले असतानाही हिरव्या रंगाचे असतात.

१४. केसर

सर्वात महागड्या जातींपैकी एक जात. आंबाच्या रंग केशरसारखा दिसतो, त्याच केशरी रंगावरून त्याला हे नाव देण्यात आले. हे मुख्यतः अहमदाबाद, गुजरातमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात पिकवले जातत. या जातीची लागवड जुनागढच्या नवाबांनी १९३१ मध्ये प्रथम केली आणि १९३४ मध्ये त्याचे नाव केसर ठेवण्यात आले.

कसे ओळखावे: त्याचा वास केसरसारखा आहे जे त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य आहे.

१५. बदामी

बदामी ही कर्नाटकातील आघाडीची आंब्याची जात असून एप्रिल ते जुलै या कालावधीत हा आंबा बाजारात येतो. पोषक तत्वांनी भरलेल्या या जातीची साल अतिशय पातळ असते आणि हा आंबा कर्नाटक राज्यातील अल्फोन्सो म्हणून प्रसिद्ध आहे.

कसे ओळखावे: या जातीच्या सालीला चमकदार सोनेरी पिवळा लाल रंगाची छटा असते जी फळाच्या वरच्या बाजूला पसरते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-05-2022 at 17:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×