scorecardresearch

Skin Care Tips: ‘या’ फुलामध्ये लपला आहे सौंदर्याचा खजिना; फुलापासून बनवा घरच्या घरी फेसपॅक

आम्ही तुमच्यासाठी आता एका खास फुलापासून तयार केलेलं फेसपॅक घेऊन आलोय. हे फूल तुमच्या केसांचे सौंदर्य तर वाढवतेच पण तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्यही वाढवू शकते.

Jasmine Flower
फुलापासून बनवा घरच्या घरी फेसपॅक (Photo-Pixabay)

Jasmine Face Pack: ऑफिसची कामे, घरातील कामे आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त असताना महिला अनेकदा आपल्या त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यासोबतच अनेक वेळा महिला पार्लरमध्ये जाण्याचा विचार करतात, परंतु वेळेअभावी तेही शक्य होत नाही. काही महिला रात्रीच्या वेळेस न चुकता स्किन केअर रुटीन फॉलो करतात. पण सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा केवळ फेस वॉशने स्वच्छ करतात. तर काही महिला घरच्या घरी अनेक आयुर्वेदिक उपाय करुन पाहतात. मात्र आम्ही तुमच्यासाठी आता एका खास फुलापासून तयार केलेलं फेसपॅक घेऊन आलोय. हे फूल तुमच्या केसांचे सौंदर्य तर वाढवतेच पण तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्यही वाढवू शकते.

चमेलीच्या फुलापासून फेस पॅक –

या फुलाचं आहे नाव आहे चमेली. हो चमेलीच्या फुलापासून तुम्ही नॅचरल फेसपॅक बनवू शकता. अनेकदा स्त्रिया चमेलीच्या फुलापासून गजरा बनवून आपल्या सौंदर्यात भर घालतात. पण तुम्हाला माहित आहे का की चमेलीची फुलं तुमच्या त्वचेचीदेखील शोभा वाढवू शकते. त्वचेवरील पुरळ, लालसरपणा, सूज दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. चमेलीच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. ज्याचा उपयोग त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

कसा बनवायचा चमेलीच्या फुलापासून फेस पॅक –

चमेलीचे फूल घेऊन ते कच्च्या दुधात मिसळून बारीक करा.
आता त्यामध्ये थोडेसे केशर, थोडे गुलाबजल आणि थोडी कॉफी घाला.
हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा.
हा फेसपॅक ३० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या
थोड्या वेळाने चेहरा पाण्याने धुवा.

अशा प्रकारे वापरा चेहरा उजळण्यासाठी चमेलीचे फूल बारीक करून त्यात थोडेसे गुलाबजल टाकून रोज चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. याशिवाय त्यात लिंबू आणि मध टाकूनही तुम्ही फेसपॅक बनवू शकता.

या समस्यांसाठी चमेलीचा फेस पॅक फायदेशीर-

सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. वृद्धापकाळात सुरकुत्या पडण्याची समस्या अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत चमेलीच्या फुलांनी बनवलेला फेस पॅक लावल्यानं तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होते. तसेच चमेलीच्या फेस पॅकने तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. त्वचेचे रक्ताभिसरण वाढते आणि यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळू शकते.

हेही वाचा – video: कॉलेजचा शेवटचा दिवस, विद्यार्थी बेभान; अचानक स्लॅब कोसळून २५ विद्यार्थी..

चमेलीचा फेस पॅक देखील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही थकलेल्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली पॅक लावला तर ते तुमच्या मज्जातंतूंना शांत करते, तुम्हाला आरामदायी वाटते. जास्मीनची फुले कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत. ते त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि रंग वाढवतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 13:47 IST

संबंधित बातम्या